लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेड : गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजुंनी बाभळीचे झाडे वाढली आहे. त्या झाडांच्या फांद्या आता रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा होत आहे. परिणामी अपघाताचाही धोका वाढला आहे.गावातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाभळीची झाडे वााढलेली आहे. त्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच वाहनचालकांनाला या फांद्याचे फटके लागत असल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर झाडाच्या फांद्या आल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविणे हे ग्रामपंचायतचे काम असतांना ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांचा विचार करुन तसेच अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठांनी या अडचणीकडे लक्ष द्यावे, अशी माागणी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष अरुण खजुरे यांनी केली आहे.
रस्त्यावरील झाडांच्या फांद्यामुळे रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:44 PM