लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेत पंचायत समिती सदस्य हेमचंद रंगारी व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आले. या निवेदनात सदर शिक्षिकेची तत्काळ बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षणाधिकाºयांनी तात्काळ बदलीचे आदेश दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.दहेगांव (स्टेशन) च्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षिका प्रिया खरवडे यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे बढीया या शिक्षिकेची वागणूक बदलेली आहे.२५ सप्टेंबरला बढीया या शाळेत उशिरा आल्याने मुख्याध्यापक खरवडे यांनी विचारणा केली असता बढीये यांनी त्यांच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली व स्वत:ला शाळेच्या खोलीत कोंडून घेतल्याचा प्रकारही घडला. हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी बघितल्याने विद्यार्थीही गोळा झाले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता बढीये यांनी विद्यार्थ्यांनाही शिविगाळ करुन त्यांच्या अंगावर धावत जाऊन विद्यार्थ्याचा गळा दाबला. हा प्रकार पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन दुतारे, अरविंद खोडके, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दुबे व पंचायत समिती सदस्य हेमचंद रंगारी यांना बोलाविण्यात आले. शाळेतील प्रकार पाहून वर्धा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पाटील, विस्तार अधिकारी तायडे व बाराहाते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी शाळेत येऊन चौकशी केली. यावेळी ग्रामस्थांकडून बढीये यांच्याविरुध्द तक्रारी करण्यात आल्या. परंतू अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाºया बढीये नामक शिक्षिकेची बदली करून त्यांना बडतर्फ करावे; अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सभापती मिलींद भेंडे, पंचायत समिती सदस्य हेमचंद रंगारी, ओबीसी मोर्चाचे गजू दुतारे, भाजयुमोचे जिल्हा सचिव गौरव गावंडे, अरविंद खोडके, सुधाकर जामनकर, बबलू मोकाशी, शंकर मोकाशी,शशिकला जाधव, सुलोचना बोरकर, बेवी जाधव यांची उपस्थिती होती.
मारहाण करणाऱ्या शिक्षिकेची बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:55 PM
तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.
ठळक मुद्देमागणी : मुख्य कार्यपालन व शिक्षणाधिकाºयांना निवेदन