लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्थिक उत्पन्न वाढावे आणि खासगी प्रवासी वळविण्यासाठी एसटी महामंडळाने शिवनेरी, हिरकणी या दोन नवीन आराम आणि निमआराम प्रकारच्या बसेस वाहतुकीसाठी सुरू केल्या.नुकतीच वातानूकूलित आणि आकर्षक शिवशाही बस देखील सुरू केली. परंतु, नव्याचे नऊ दिवस संपले. अनेक शिवशाही बसेसच्या वातानुकूलित सेवा बंद अवस्थेत आहेत. अधिक पैसे मोजून देखील प्रवाशांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. १९८0 पर्यंत या महामंडळाला कुणी स्पर्धक नसल्यामुळे एसटी तेजीत होती.कालांतराने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी, सहाचाकी वाहने रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे लालपरिऐवजी खासगी वाहतुकीला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांकरिता महामंडळाने विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले. एशियाड बस सुरू केली. या बसने प्रवास करणे हे भूषणावह वाटत होते.या बसने एक वेगळीच क्रेझ निमांण केली होती. कालांतराने या बसची अवस्था लालपरीसारखी झाली. सध्या या बसने प्रवास करण्याऐवजी प्रवासी साध्या लालपरीला प्रतिसाद देत आहेत.दहा वर्षांपूर्वी महामंडळाने शिवनेरी, हिरकणी या आरामदायी बसेस रस्त्यावर आणल्या. शिवनेरी ही आकर्षक व महागडी बस फक्त मोठमोठ्या शहराच्या दिशेने धावत आहे. युती शासनाने गेल्या काही वर्षात शिवशाही ही बस सुरू केली आहे. मोठी उंच आणि आकर्षक दिसणाºया या बसेसचे दर देखील अधिक आहेत. या बसमध्ये प्रवाशांना बसण्याकरिता सुव्यवस्थित आसनव्यवस्था आणि वातानुकूलित सेवा उपलब्ध आहे. या बसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिवशाही रस्त्याने धावू लागताच जनतेच्या नजरा त्यावर खिळून राहतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या बसेसमधील वातानुकूलित सेवा बंद पडली आहे.बंद पडलेली ही सेवा महामंडळाचे अधिकारी कर्मचारी गांभाीर्याने घेताना दिसत नाहीत. चारही बाजूने मोठमोठ्या काचा लागलेल्या आहेत. वातानुकूलित सेवा बंद राहत असल्याने प्रवाशांना भरदुपारी प्रवास करताना घाम फूटत आहे तर बसमध्ये अस्वच्छताही वाढली आहे. महामंडळ प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेत एकप्रकारे त्यांची लूट करत आहे.प्रवासी पळविण्याचा प्रकारकाही खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून बसस्थनक परिसरात येत थेट प्रवासी पळविण्याचे प्रकार सुरू आहे. खासगी वाहनचालक आपले वाहन एसटी निघण्यापूर्वीच काढत असल्याने नागरिक खासगी वाहनाचा आधार घेताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शिवशाहीत फुटतो प्रवाशांना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:00 AM
१९८0 पर्यंत या महामंडळाला कुणी स्पर्धक नसल्यामुळे एसटी तेजीत होती. कालांतराने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी, सहाचाकी वाहने रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे लालपरिऐवजी खासगी वाहतुकीला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांकरिता महामंडळाने विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले. एशियाड बस सुरू केली. या बसने प्रवास करणे हे भूषणावह वाटत होते.
ठळक मुद्देवातानुकुलित सेवा बंद : महामंडळाकडून प्रवाशांची लूट