शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

ट्रॅव्हल्सला बसस्थानकात ‘नो-एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:24 PM

एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चवथ्या दिवशीही शुक्रवारी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते.

ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने निवळला रोष : एसटी कामगारांचा बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चवथ्या दिवशीही शुक्रवारी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते. तत्पूर्ती परवानगी मिळाल्याने शुक्रवारी काही ट्रॅव्हल्स चालकांनी आपली वाहने वर्धा बसस्थानकात नेली. दरम्यान आंदोलनकर्ते व ट्रॅव्हल्सचालक यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीअंती परिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यात आले.एसटी संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हालराज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहकांनी संप सुरू केला असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. खासगी अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन मनमानी करीत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अतिरिक्त रक्कम ही प्रवाशांना द्यावी लागत आहे. वर्धा-आर्वी मार्गावर खरांगणा भागात मोठ्या प्रमाणावर काळीपिवळी वाहनाला लटकून प्रवास करीत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.वर्धा विभागाला चार दिवसात कोटींचा फटकाबेमुदत संप आंदोलनामुळे रापमंच्या जिल्ह्यातील पाच आगारातील एकूण ३१५ बसेस शुक्रवारीही उभ्या होत्या. जिल्ह्यातील विविध बसस्थानकासह आगारातून सुमारे ५ हजार बस फेºयांचे नियोजन दररोज केले जाते. परंतु, गत चार दिवसांपासून रापमची एकही बस न धावल्याने वर्धा विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात सुमारे एक कोटींचा फटका बसल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले.गैरसोय टाळण्यासाठी २०० ट्रॅव्हल्स रस्त्यावरप्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वर्धा-नागपूरसाठी ४२ ट्रॅव्हल्स तर नागपूर-वर्धा-यवतमाळकरिता ९५ ट्रॅव्हल्स खासगी प्रवासी वाहतूक करणाºयांकडून रस्त्यावर धावविल्या जात आहेत. वरील प्रवासासाठी कुठलीही अतिरिक्त भाडे वाढ करण्यात आली नसून रात्री उशीरापर्यंत ट्रॅव्हल्स सुरु असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी या ट्रॅव्हल्स चालनकांकडून प्रवाशांची लूट होत असल्याची ओरड मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर प्रतिबंध लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे.