शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एक झाड कोसळताच सतरा झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 9:33 PM

येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेल्वेस्थानकावरील प्रकार; स्टेशन अधीक्षकांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या बाजुला कडुनिंब, करंज, अशोकासह मोठी झाडे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्थानकालगतच्या महेश ज्ञानपीठ विद्यालयातून पवन फड नामक विद्यार्थ्याने बघितले असता त्याला स्थानकावरील काही भाग अचानक भकास झालेला दिसून आला. त्यामुळे त्याने बाईकाने लक्ष दिल्यावर या परिसरातील झाडांची कत्तल केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर यांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाकाऱ्यांसोबत त्यांनी रेल्वे स्थानकावरील फलाट गाठला.तेव्हा फलाटालगतची एक-दोन नाही तर तब्बल सतरा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भायेर यांनी स्टेशन अधीक्षक एच.व्ही.वर्मा यांना भ्रमणध्वनीवरुन वृक्षतोडीबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच थक्क झाले. ‘या परिसरातील पिंपळाचे मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याने इतरही झाडं अशीच पडून जातील म्हणून सर्वच झाडे मुळासकट तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला’ असे वर्मा यांनी सांगितले.यावेळी आशिष भोयर यांनी वर्मा यांना या झाडांबाबत माहिती दिल्यानंतर अधीक्षक वर्मा यांना चूक कळली. त्यामुळे ज्या झाडांवर कुºहाड पडणार होती. ती झाडं तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करुन पर्यावरणाची नुकसान भरपाई म्हणून चारपट झाडं लावण्यात यावी, या मागणीचे निवेदनही पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला दिले.हिंगणघाटचे पर्यावरणवादी जागरुकरेल्वेस्थानकावरील वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती मिळताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यापूर्वीही शहरात एका डॉक्टरने गाडी ठेवता येत नाही म्हणून वृक्षतोड केली होती. याबाबतही शहरातील पर्यावरणवाद्यांनी पुढाकार घेत त्या जागी वृक्ष लावून घेतले होते. तसेच राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या कामात करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या विरोधातही येथे पर्यावरणवादी व वृक्षप्रेमींनी जाहीर नाराजी व्यक्त करून शासनाला तसे निवेदनही सादर केले होते. ही जागरूकता फक्त हिंगणघाटमध्ये दिसून येते.