समुद्रपूर : चंद्रपूर येथून कोळसा भरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने हिंगणघाट कडून येणाऱ्या कंटेनरला जबर धडक दिली. यात ट्रक चालक अजित तन्ना (३५) रा. चंद्रपूर हा गंभीर जखमी झाला. सदर घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जाम चौरस्ता येथे घडली. ट्रक एमएच ३४ एबी- १८२७ चा चालक अजित तन्ना चंद्रपूर येथून कोळसा भरून बुट्टीबोरीला जात होता. तर कंटेनर आरजे १४ जीसी १४७० चा चालक बालादिन यादव (३५) रा. सुपरी (युपी) हा बंगलोरवरून दुचाकी गाड्या घेवून उत्तरप्रदेशकडे जात होते. जाम चौरस्ता येथे कोळसा भरून असलेल्या ट्रकने कंटेनरला जबर धडक दिली. या धडकेत ट्रक व कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला. त्याला समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराअंती नागपूरला हलविले. या प्र्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाम चौरस्त्यावर अपघात नेहमीचेच असल्याने येथे कामयस्वरूपी उपाय योजनेची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे अपघातमहामार्ग हैदराबाद-नागपूर व जाम जवळ दिशादर्शक फलक लावलेला आहे. या फलकावर नागपूर सरळ दाखविले. जाम चौकातून डावीकडे वळन घ्यावे लागते. या फलकामुळे चौकात वाहन चालकाचा गोंधळ उडतो. यामुळे अपघात घडत असतात. तो फलक दुरुस्त करण्याची मागणी जामचे उपसरपंच सचिन गांवडे यांनी केली आहे.
ट्रक-कंटेनर अपघातात चालक गंभीर
By admin | Published: April 01, 2015 1:47 AM