शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ट्रक-कंटेनरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:15 PM

येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देएक ठार । एक गंभीर, वणा नदीच्या पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावरील वणा नदीच्या पुलावर एम.एच. ४०-९९७३ क्रमांकाचा कंटेनर आणि टी.एस. १२ यू.बी. १८११ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात ट्रक चालक मुजीब एम. खान (४९) रा. बहादुरपुरा हैदराबाद याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसºया वाहनाचा चालक अनिलकुमार यादव (३२) हा गंभीर जखमी झाला. ट्रक हा हैद्राबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होता. तर कंटेनर हैद्राबादच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने वणा नदीच्या पुलाजवळ आली असता त्यांची समोरासमोर धडक दिली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. विशेष म्हणजे, वणा नदीच्या जुन्या पुलावरून मागील एक वर्षांपासून वाहतूक बंद आहे. दुरुस्तीच्या कारणावरून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने एकाच पुलावरून सध्या वाहनांची ये-जा होते. अशातच हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. दोन्ही वाहने समोरासमोर भिडल्याने दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जमादार विनोद कांबळे आणि पोलीस शिपाई शैलेश भालशंकर यांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनातून मृतकाला बाहेर काढले. शिवाय पंचनामा केला. या अपघातामुळे काही वेळाकरिता या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. परंतु, पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन वेळीच बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.कारच्या धडकेत एक ठार; एक जखमीहिंगणी - येथील सेलू मार्गावर कारने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. श्याम ईश्वर साबळे (३७) रा. केळझर, असे मृतकाचे तर दिनेश बोंदाडे (३०) रा. केळझर असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, श्याम व दिनेश हे बोरधरण येथून केळझरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे, जखमीच्या मदतीला आॅटो चालक महेश बंडेवार, धीरज दुर्गे हे धावून आले. त्यांनी जखमीला तातडीने मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले.

टॅग्स :Accidentअपघात