लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील दयालनगर परिसरात मोकळ्या जागेवर उभा असलेला ट्रक बुधवारी २० फेब्रवारीला चोरीस गेला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत अवघ्या चोवीस तासात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून दोन आरोपीला अटक करुन ट्रक जप्त केला.मोहम्मद इशाक शेख बहादुर (५५) रा. बाल मंदिरजवळ, मुर्तिजापूर जि.अकोला व मुकेश कुमार उर्फ राजीव रमाशंकर यादव (२८) रा. रामपूर बेगलान, जि.सतना (म.प्र) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अजमुद्दीन मसरुद्दीन शेख रा. गोंड प्लॉट यांच्या मालकीचा एमएच ३१ सीक्यू ५८१९ क्रमांक असलेला ५ लाख रुपये किमतीचा ट्रक दयालनगरातील देवळी नाका परिसरातून चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी अजमुद्दीन मसरुद्दीन शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना मूर्तिजापूरला ट्रक असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने मूर्तिजापूर पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेल्या ट्रकसह दोन्ही आरोपींना अटक केली. यात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे यांच्या उपस्थितीत नामदेव किटे, उदयसिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, हरिदास काकड, नरेंद्र डहाके, हरिदास काकड, अमर लाखे, आनंद भस्मे, दिनेश बोथकर, सचिन खैरकार आदींनी केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
ट्रक चोरट्यांना चोवीस तासांत ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:29 PM
येथील दयालनगर परिसरात मोकळ्या जागेवर उभा असलेला ट्रक बुधवारी २० फेब्रवारीला चोरीस गेला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत अवघ्या चोवीस तासात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून दोन आरोपीला अटक करुन ट्रक जप्त केला.
ठळक मुद्देमूर्तिजापुरातून दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई