लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या तत्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आ. डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आले. यावेळी आ. भोयर यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश कामगारांनी आपली नोंदणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात केली असून त्यांना मंडळाच्या योजना लागू आहे. सदर योजनेमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. परंतु, अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. जो अनेकांचे घरे बांधतो, त्याच्याच कडे सध्या स्वतचे घर पक्के नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व भविष्यासाठी त्यांच्याकडे रोजमजुरीशिवाय पर्याय नाही. त्यांच्या अनेक हुशार मुलांकडे लॅपटॉप सारखे आधुनिक साहित्य नाही. शिवाय त्यांना आरोग्य सेवेत कुठलीही विशेष सवलत दिली जात नाही, यासह विविध समस्यांना सध्या बांधकाम कामगारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना बांधकाम कामगार कृती समितीचे जिल्हा सचिव उमेश अग्निहोत्री, अरूण ठाकूर, दिनेश धुर्वे, दिलीप कोरे, मारोती मुठाळ, राजू मुठाळ, निळकंठ ठवळे, बंडू करनाके, सुरेश पिसे, शोभा मेंढे, मंदा मानकर, सविता ओकटे, माया पांडे, अर्चना धरत, आशीष बुरबुरे, नेहा अरक, पूजा काकडे, रेखा किसवे, सुनीत किसवे, हेमा ओकटे, संगीता वानखेडे, वैशाली निनावे, रेखा राजवाडे, सुनंदा तरोणे, सतीश सहारे, गजानन धार्मिक, ज्ञानेश्वर कुंभारे, विलास कुंभारे, नरेंद्र भिसीकर, पवन खडतकर, संजय भांदककर आदी उपस्थित होते.
बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- भोयर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 11:42 PM
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या तत्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आ. डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आले. यावेळी आ. भोयर यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.
ठळक मुद्दे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या तत्काळ निकाली