लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वरिष्ठांकडे तक्रार होताच बोरगाव गोंडी येथील वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी व खरांगणा विशाल सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मेघराज पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यात खोटी माहिती देऊन महावितरणचीही फसगत केली.वनरक्षक मनीष सज्जन मुख्यालयी राहत नाहीत. ग्रामस्थांना असभ्य वागणूक देतात. वृक्षलागवडीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नुकतीच ग्रामस्थांनी वनमंत्री व उपवनसंरक्षक यांच्याकडे केली. यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश धडकले. त्यामुळे खवळलेल्या वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला.महावितरणला खोटी माहिती देत शेतकऱ्याने तारावर हूक टाकून कुंपणात वीजप्रवाह सोडला व यात तीन रानडुक्कर ठार झाल्याची माहिती दिली. याविषयी माहिती मिळताच रात्री १० वाजता खरांगणा येथील कनिष्ठ अभियंता चैतन्य देशपांडे यांनी दहा कर्मचाºयांसह बोरगाव गोंडी गाठले. शेतात बारकाईने चौकशी केली, पण कुठेही काहीच आढळले नाही. त्यामुळे फसगत झाली, असे समजून ते परत गेले. लागलीच त्यांनी वनरक्षकाला शेतात कोणताही प्राणी मृतावस्थेत न आढळल्याचे कळविले. सूडबुद्धीने पेटलेल्या वनरक्षकाने जंगलातील मृत प्राण्यांचे अवशेष गोळा करून ते सहकाºयांसह पेठे यांच्या शेतात जात मातीत विखुरले व तेच अवशेष पुन्हा कापडात गुंडाळून शेताबाहेर आणून उघड्यावर त्याचा बाजार मांडून फोटो सेशन केले. चूक आपल्या अंगलट येत असल्याचे पाहून त्याने काहीही करून तक्रारदाराला फसविण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.घटनेतील शेतक-याचे शेत बोरगाव गोंडी-सुसूंद रस्त्यावर असून संपूर्ण शेताला ताराच्या जाळीचे कुंपण आहे. जाळीतून उंदीरसुद्धा जाऊ शकत नाही, मग रानडुक्कर कसा जाईल? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. वनरक्षकाने दडपशाहीतून बोरगाव गोंडी बिटात मोठी माया जमविली असून त्या विरोधात बोलणाºया प्रत्येकाला बघून घेण्याची धमकी दिली जाते.उपवनसंरक्षकांनी दखल घेऊन सूडबुद्धीने वागणाºया वनरक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वनविभागाच्या तक्रारीवरून सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचलो. शेतात बारकाईने शोध घेतला, पण शेतात कुठेही हूक टाकलेला दिसून आली नाही. मृत वन्यजीव सुध्दा दिसला नाही.चैतन्य देशपांडे, कनिष्ठ अभियंता,खरांगणावनरक्षक मनीष सज्जन यांच्याविरोधात ग्रामस्थांनी वनमंत्र्यांकडे तक्रार केली. त्या निवेदनावर पहिल्या क्रमांकावर माझी स्वाक्षरी आहे. त्यांनी मला आधीच बघून घेण्याची धमकी दिली होती व हा निव्वळ सूड उगविण्याचा प्रकार आहे.- मेघराज पेठे, बोरगाव गोंडी
तक्रारकर्त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 8:20 PM
वरिष्ठांकडे तक्रार होताच बोरगाव गोंडी येथील वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी व खरांगणा विशाल सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मेघराज पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यात खोटी माहिती देऊन महावितरणचीही फसगत केली.
ठळक मुद्देवनरक्षकाची सूडबुद्धी : जंगलातील हाडे शेतात टाकली