लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो वा महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद प्रत्येकाने त्यांच्या जीवनात पुस्तक वाचनाला महत्त्व दिले. बाबासाहेबांनी तर दिसेल तिथे आवडीचे पुस्तक विकत घेवून ते वाचण्याचा सल्ला दिला. वाचनातून बौद्धीक उत्कर्ष होतो. हीच पुस्तके या महान विभूतींच्या जडण घडणात महत्त्वाची ठरली. त्यांचा हाच वैचारीक वसा पुस्तकातून जपण्याचा प्रयत्न करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.आजचा युवक त्याच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके हाताळताना दिसत नाही. ज्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी होत आहे तेच केवळ ग्रंथालयात जावून तेवढी पुस्तके हाताळताना दिसतात. इतरांचे हात मात्र इंटरनेट आणि सोशल मिडीयावरच व्यस्त असल्याचे दिसत आहे.यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या गरजेपोटी जिल्ह्यात सचीन सावरकर नामक एका प्राध्यापकाच्या माध्यमातून ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यांच्या अभियानातून उन्हाळ्याच्या सुट्यांत घरोघरी फिरून चिमुकल्यांना इतिहासात मोलाचा वाट असणाऱ्या अनेक महात्म्यांची माहिती देणारी पुस्तके देण्यात येत आहेत. निदान यातून काहींना वाचनाची आवड निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.मागेल त्याला वाचनालय योजना बंदशासनाच्यावतीने मागेल त्याला वाचनालय ही योजना सुरू केली होती. ती योजना नव्या शासनाने बंद केली आहे. यामुळे वाचणालयाची संख्या कायम आहे.राज्यात आजच्या घडीला १२ हजार ५०० ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांची वाचनाची भूक भाबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागात जर ग्रंथालय निर्माण झाले तर काही ना काही प्रमाणात वाचकांच्या संख्येत वाढ होईल.‘पुस्तकदोस्ती’तून आतापर्यंत ३००० पुस्तकांचे वाटपवाचन संस्कृती टिकावी आणि चिमुकल्यांना पुस्तके हाताळण्याची सवय व्हावी याकरिता जिल्ह्यात ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजारावर पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. जेणेकरून त्यांची पुस्तकाशी दोस्ती होईल, असा त्यांचा उद्देश आहे.दोन ग्रंथालये १०० वर्षांपेक्षाही जुनीजिल्ह्यातील वाचकांच्या सेवेत असलेले वर्धेतील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व आर्वी येथील लोकमान्य वाचनालयाला शंभर वर्षांपेंक्षा अधिक काळ झाला आहे.
११५ ग्रंथालयातून पुस्तके हाताळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:40 PM
इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.
ठळक मुद्देजागतिक पुस्तक दिन : बौद्धिक विकासाकरिता वाचनाशिवाय पर्याय नाही