लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सामाजिक बांधिलकी जोपासत अनोखे सामर्थ्य अपग मित्र परिवार महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ९० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.स्थानिक गुरुनानक धर्मशाळा येथे पार पडलेल्या मेळाव्यात विवाह इच्छुक असलेल्या ९० दिव्यांग मुला-मुलींनी आपला परिचय दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मशाळेचे सचिव टेकचंद मोटवाणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दादाराव केचे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या सचिव प्रिया शिंदे, अनोखे सामर्थ्य दिव्यांग मित्र परिवारचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यप्रकाश भट्टड, आर्वीचे ठाणेदार अशोक चौधरी, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दामोधर बांगरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मेघा आव्हाड हिला तीन चाकी सायकल तर सतीश शुक्ला यांना व्हिल चेअर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी दिव्यांग व्यक्ती सोबत सुदृढ व्यक्तीने लग्न केल्याबद्दल संगीता अरुण मानकर यांच्या हस्ते मिनाक्षी पांडे, वर्षा धर्मदत्त बुरे, संगिता कारणकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मानकर यांनी केले. संचालन देव्यानी सहारे यांनी केले तर आभार धर्मदत्त बुरे यांनी मानले. उपवर-वधूचा परिचय विलीन पांडे यांनी करुन दिला. यशस्वीतेकरिता सुधाकर भेदे, हरी भरे, धर्मदत्त बुरे, प्रभाकर भेदे, हर्षल पांडे, प्रकाश बिजवे, विनोद त्रिवेदी, भगवती अग्रवाल, विनोद सहारे, सुबोध ठाकरे, प्रकाश सहारे, संजय गोमासे, उपराटे, उमेश बारापात्रे, श्यामराव ठाकरे, खंडाळकर आदींनी सहकार्य केले.
दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:43 AM
सामाजिक बांधिलकी जोपासत अनोखे सामर्थ्य अपग मित्र परिवार महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ९० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
ठळक मुद्देअनोखे सामर्थ्य अपंग मित्र परिवाराचा उपक्रम : मुला-मुलींनी दिला परिचय, उल्लेखनिय कार्य करणारे सन्मानीत