शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

डिसेंबरच्या अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोविडने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 5:00 AM

मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्येचे ‘’’’डेथ ऑडिट’’’’ सध्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे६६७ व्यक्तींचा कोरोनावर विजय : जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९२ टक्क्यांवर

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा पातळीसह गावपातळीवर विविध प्रयत्न होत असले तरी मागील अकरा दिवसांच्या कालावधीत तब्बल बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्येचे ‘’’’डेथ ऑडिट’’’’ सध्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मागील अकरा दिवसांचा विचार केल्यास ६६७ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ७ हजार ७६७ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे. असे असले तरी दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनीही दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे क्रमप्राप्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या बरोबरीनेचसध्या राज्याचा कोविड मृत्यू दर २.५७ टक्के असल्याचे सांगण्यात येते. असले तरी राज्याच्या बरोबरीनेच वर्धा जिल्ह्याचा मृत्यू दर सध्या कायम असल्याने आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्याचा कोविड मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच रिकव्हरी दरात वाढ करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोरोना टेस्टची गती मंदावलीऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्यांची गती मंदावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आरटीपीसीआर पद्धतीचा अवलंब करीत २०० पेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्याची आमची अधिकची श्रमता नाहीच असे जिल्ह्यातील दोन्ही प्रयोगशाळांमधील अधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागालाही ॲन्टिजेन पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक कोविड टेस्ट कराव्या लागत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या