लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता माजी आमदार राजु तिमांडे यांनी कामगारांसह कामगारमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.हिंगणघाट येथील मोहता मिलला १२५ वर्षाचा इतिहास आहे. मोहता ग्रुपने या मिलच्या भरोशावरच गिमाटेक्स हिंगणघाट, गिमाटेक्स वणी, पी.व्ही.टेक्सटाईल्स जांब, आर.एस.आर.मोहता मिल्स बुरकोणी आदी कंपन्या उभ्या केल्या आहे. या सर्व कंपन्या अद्ययावत असून चांगल्या प्रकारे कामकाज सुरु आहे. या कंपन्यांच्या विकासाला कामगारांच्या कष्टाने चालना मिळला आहे. पण, आता सहा महिन्यापासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना जाणीवपूर्वक काम दिले जात नाही. तसेच अन्य विभागातही कॉप्लीमेंट असूनही काम मिळत नाही. विशेषत: वीस वर्षांपासून या कामगारांना कायम केले नाही. दोन महिन्यापासून या सव्वाशे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच ले-आॅफ देण्यात येतो परंतु कामगारांना ले-आॅफचे वेतन दिले जात नाही.बदली कामगारांना रिटर्न देण्यात येते पण, रिटर्नचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे या कामागारांच्या परिवाराचा उदनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मिल व्यवस्थापन युनियनची बैठक बोलवाहिंगणघाट येथील मोहता मिलमधील कामगारांच्या समस्येबाबत मुंबई येथे मिल व्यवस्थापन युनियन पदाधिकारी, आमदार व खासदार यांची संयुक्त बैठक बोलावून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी माजी आमदार तिमांडे यांनी पक्षनेते शरदचंद्र पवार व अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटीतून केली आहे. आता कामगारांचे लक्ष न्यायाकडे लागले आले.
मोहता मिलच्या सव्वाशे कामगारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:28 PM
हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता माजी आमदार राजु तिमांडे यांनी कामगारांसह कामगारमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
ठळक मुद्देकपडा खाता केला बंद : माजी आमदाराचे न्यायासाठी कामगार मंत्र्यांना साकडे