लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला. जखमींना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. २९ के.डी. ५०४८ क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने यवतमाळ येथील १८ जण नागपूरला देवदर्शनाला गेले होते. परतीच्या प्रवासात भिवापूर शिवारात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते एका सिमेंटपुलावरून खाली कोसळले. यात नागोराव कर्णूजी गायकवाड (८९), रा. राजुर, इंझाळा, वणी, व कल्पनाबाई लालाजी दारोंडे (५५), ता. पांढरकवडा यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये ज्ञानेश्वर पुंडलिक गायकवाड, पूजा दादाराव बेसेकर, संगलबी मोहम्मद खान पठाण, कल्पना दिवाकर तडस, रविना एकनाथ धुर्वे, शीतल दादाराव बेसेकर, निर्मला लक्ष्मण राऊत, रोशनी वाडे, दिक्षा बेसेकर, भगीरथा बेसेकर, भावना राऊत, राणी दीपक राऊत, योगेश गायकवाड, राजनंद गायकवाद, सचिन गायकवाड, गौतम गणवीर यांचा समावेश आहे. वाहनचालक गौतम गणवीर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वर्धा जिल्ह्यात भाविकांची जीप कोसळून दोन ठार, १६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:53 PM
नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला.
ठळक मुद्देजखमींना वडनेरच्या रुग्णालयात केले दाखल