बायपासवरील घटना : एक जण गंभीर यवतमाळ : शहरातील पांढरकवडा आणि धामणगाव मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारस घडली. गुलाब विठ्ठलराव पवार (४०) रा. विश्वकर्मा नगर पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. पवार हे रात्री ९ वाजताच्या सुमारास धामणगाव मार्गावरील पिंपळगाव बायापासने पायदळ जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी अविनाश राजू चव्हाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरकवडा मार्गावरच्या अघातात समीर गजनान गवळी (२५) याचा मृत्यू झाला तर मनोज आडे (२७) रा. शाहु नगर पिंपळगाव हा जखमी आहे. हे दोघे दुचाकी (एमएच २९ एए ६२००) ने येत असताना सिध्देश्वर मंदीर परिसरात ट्रॅक्टर (एमएच २९ व्ही ०६२२) ने जोदारा धडक दिली. ही घटना रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणात अशोक गवळी यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक आत्माराम नामदेवरा कासार (३२) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटना अर्ध्यातासाच्या फरकाने घडल्याने एकच खळबळ निर्माण झाली. बायपासवर भरधाव वाहतूक सुरू असते. त्या ठिकाणी या वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नसते. परिणामी अपघाताच्या घटना वारंवार घडतात. पोलीस मात्र वाहनांची ‘तपासणी’ करण्यातच व्यस्त दिसतात. मृत अर्भक आढळलेआर्णी तालुक्यातील उमरीपठार येथील एका गिट्टी खदानमध्ये मृत अर्भक आढळल्याने मंगळवारी खळबळ उडाली. स्त्री जातीचे असलेले हे अर्भक आढळल्याची माहिती आर्णी पोलिसांंना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक असावे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकार केला असल्याची चर्चा परिसरात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू यवतमाळ : शहरातील मोहा परिसरात सोमवारी दुपारी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कमला हुसेन आत्राम (५०) ही महिला विहिरीत पडली. या प्रकरणी हुसेन आत्राम याने दिलेल्या माहिती वरून शहर पोलिसांनी विहिरीत कमलाचा शोध घेतला. मात्र तिचा मृतदेह मिळत नव्हता, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
दोन अपघातात दोघांचा मृत्यू
By admin | Published: June 29, 2016 2:23 AM