हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की, जाती-पातीचे राजकारण आलेच. त्यातून विरोधकांचा गटही सक्रीय होऊन गावामधील एकोपा आणि शांततेलाही बाधा निर्माण होते. पण, हिंदू बहूल असलेल्या गावामध्ये एकच मुस्लिम कुटूंब असताना गावकऱ्यांनी एक-दोन वर्षे नाही तर तब्बल २० वर्षे गावाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी ते मुस्लिम परिवार मोठ्या खंबिरपणे पेलून गावाच्या विकासात भर घालत आहे.देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे. त्यापैकी वीस वर्ष ेअयुब अली पटेल व त्यांची पत्नी शाहीन अंजूम यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आताही शाहीन अंजूम या सरपंचपदाची निर्भिडपणे धुरा सांभाळत आहे. कोरोना काळात सरंपच आणि सदस्यांना ग्रामस्थांचे पाठबळ असल्याने गाव कोरोनामुक्त राहिले आहे. गेल्या तीन दशकांपासून या गावात सर्वधर्म समभावावी प्रभावीपणे रुजवण होत असल्याने हे गाव इतर गावांसाठी नक्कीच पे्ररणादायी ठरणारे आहे.
दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM
देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे.
ठळक मुद्देरत्नापूर गावात नांदतोय सामाजिक एकोपा