लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेततळ्यात आंघोळ करण्याकरिता गेलेला युवक बुडत असल्याचे दिसताच शेजारी असलेल्या शेतातील शेतमजुराने युवकाला वाचविण्याकरिता थेट तळ्यात उडी घेतली. यात त्याचा मृृत्यू झाला. तर बुडत असलेल्या युवकाला बेशुद्धावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचाही मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास केळापूर शिवारात घडली.अंकीत बैस (१५) रा. वर्धा आणि शेतमजूर अनिल चंपत जिचकार (५०) रा. केळापूर अशी मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे.पोलीस सुत्रानुसार, वर्धा येथील राजेश जयस्वाल यांचे केळापूर शिवारात शेत आहे. जयस्वाल यांच्या शेतालगतच राजेश बैस यांचे शेत आहे. आज सकाळी बैस यांचा मुलगा अंकीत या शेताकडे आला असता तो जयस्वाल यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात आंघोळ करण्याकरिता गेला. शेततळ्यात आंघोळ करताना त्याला खोल पाण्यात जाण्यास त्याच्या वडिलांनी नकार दिला होता. मात्र वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत तो खोल पाण्यात गेला. अंकीत बुडत असल्याचे दिसताच तळ्याच्या काठावर उभे असलेल्या राजेश बैस यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकताच शेजारी शेतातील शेतमजूर अनिल जिचकार याने धाव घेत थेट तलावात उडी घेतली. यात त्याचाच बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच पुलगाव पोलिसांनी दोघांनाही बाहेर काढले असता अनिलचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तर अंकित बेशुद्ध असल्याने त्याला जिल्हा सामान्य ुरुग्णालयात नेले असता तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.गाळात फसल्याचा संशयघटना घडली त्या शेततळ्याची खोली १० फूट आहे. तळ्याच्या तळाशी असलेल्या गाळात फसून या दोघांचाही मृत्यू झाला असावा असा संशय पोलीस प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
केळापूर येथे शेततळ्यात बुडून दोघांचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:02 AM
शेततळ्यात आंघोळ करण्याकरिता गेलेला युवक बुडत असल्याचे दिसताच शेजारी असलेल्या शेतातील शेतमजुराने युवकाला वाचविण्याकरिता थेट तळ्यात उडी घेतली.
ठळक मुद्देतळ्याची खोली केवळ दहा फूट : बुडालेल्या युवकासह त्याच्या बचावासाठी गेलेल्या शेतमजुराचाही मृत्यू