लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : घरातील स्वयंपाकघरात ठाण मांडून बसलेला नाग पाहून महिला घाबरल्या. आरडाओरडा करू लागल्या, मात्र त्या नागाच्या दहशतीतून सुटका करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. अखेर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आल्यावर या सापाला पकडून खुर्सापार जंगलात सुरक्षितस्थळी सोडण्यात आले आणि दहशतीत असलेल्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.गुरुवारी ही घटना घडली. दुसऱ्या घटनेतही नाग घरात शिरल्याने घरातील सदस्य भयभीत झाले होते. या सापाला पिटाळून लावण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले; मात्र हा नाग घरातून बाहेर निघत नसल्याने सर्पमित्रांच्या मदतीने पकडण्यात आला. गिरड येथील रहिवासी बंडू अंबाडरे आणि गरिबा गाणार यांच्या घरातील सदस्यांशी घडलेला हा प्रसंग आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्यांना या नागांनी सळो की पळो करून सोडले. दरम्यान, सर्पमित्र प्रकाश लोहट आणि महेंद्र बावणे यांनी दोन्ही घरातील नागांना पकडून खुर्सापार येथील जंगलात सुरक्षितस्थळी सोडले. बंडूजी अंबाडरे यांच्या घरून पकडलेला नाग पाच फूट दोन इंच लांबीचा होता. तर गाणार यांच्या घरून पकडलेला नाग साडेपाच फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
नागाच्या दहशतीतून दोन कुटुंबीयांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 9:38 PM
घरातील स्वयंपाकघरात ठाण मांडून बसलेला नाग पाहून महिला घाबरल्या. आरडाओरडा करू लागल्या, मात्र त्या नागाच्या दहशतीतून सुटका करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते.
ठळक मुद्देसर्पमित्रांनी दिले दोन नागांना जीवदान