वर्धा : शेतकरी कुटुंबातील एकल महिलांचा जीवन जगण्याचा संघर्ष सुसह्य व्हावा, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, याकरिता नाम फाऊंडेशनच्या वतीने ५० महिलांना शिलाई मशीन, तीन बचत गटांना शेवई यंत्राचे, तर चार बचत गटांना लेदर बॅग मशीनचे युनिट आणि ५० शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन शेळ्यांचे वितरण करण्यात आले. येथील एका मंगल कार्यालयात रविवारी हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी उदय मेघे, वर्धेचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, यशवंत दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. नूतन माळवी, संजय इंगळे तिगावकर, कल्याण तामसेकर, नाम फाउंडेशनचे विदर्भ खानदेश प्रमुख हरीश इथापे, मुरलीधर बेलखेडे, नरेंद्र पहाडे उपस्थित होते. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले. वर्धा तालुक्यातील धामणगाव, डोरली, भूगाव, सालोड, पालोती, दहेगाव (गोंडी), विजयगोपाल, बरबडी, केळापूर, आंबोडा, पडेगाव, रोठा, लोणसावळी, जऊळगाव, पालोती, करंजी (भोगे) येथील शेतकरी कुटुंबातील महिलांना शिलाई, शेवई आणि लेदर बॅग मशीन वितरण करण्यात आले. प्रास्ताविक भास्कर इथापे यांनी केले. संचालन प्रीती मख यांनी केले. आयोजनाकरिता सुहास नगराळे, पृथ्वी शिंदे, मोहीत सहारे, कपिश उमक, प्रितम महल्ले, मारूती चवरे, प्रशांत कांबळे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
५० कुटुंबांना प्रत्येकी दोन शेळ्या
By admin | Published: March 28, 2016 2:02 AM