शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:58 PM

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख.

ठळक मुद्देतिसरी पिढी जोपासतेय धार्मिक वारसा

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. या गावातून श्री.संत केजाजी महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. या वारी परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. या गावातील तिसरी व चौथी पिढीही महाराजांचा हा वारसा अजूनही चालवित आहे. त्याचा हा आढावा.आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठूरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम, सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना केवळ पंढरपूर गाठायचे असते. यंदाही विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड नगरीतून संत केजाजी महाराज पायदळ दिंडी पंढरपूरच्या वाटेने असून हे दिडींचे १५ वे वर्ष आहे. मात्र, संत केजाजी महाराज पंढरपूरची पायदळ वारी करायचे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही प्रथा १९५८ सुरू ठेवली. त्यानंतर विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी १९९२ पर्यंत पायदळ वारी केली. यांच्या पश्चात १५ ते २० वर्षांचा खंड पडला; मात्र या वारीच्या परंपरेला पावणे दोनशे वर्षांची घोराडमध्ये असलेली परंपरा आजही सुरू आहे.यवतमाळ येथील नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये घोराडवरून संत केजाजी महाराज दिंडी काढण्यास पुढाकार घेतला; मात्र ही दिंडी आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. या दिंडीत युवा, वयोवृद्ध महिला, पुरूष वारकऱ्यांचा समावेश आहे. पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले बबनराव माहुरे हे या दिडींचे विणेकरी आहेत. ते आज ८० वर्षे वयाचे आहे. २५ जूनला ही दिंडी आळंदीवरून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली. दररोज २५ ते ३० कि़मी. अंतर हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद, माऊली, तुकारामांचा जप करीत पायदळ वारी करीत असंख्य वारकरी दिवसाचा मुक्काम रात्री करीत असले तरी पहाटे ४ वाजतापासूनच दिंडीत पंढरीची आस करीत मार्गस्थ होते. या दिंडीत घोराड सह इतर गावातील वारकरी सहभागी असून जवळपास पाचशेहून अधिक वारकरी आहेत. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांकडून आहे. ही दिंडी ११ जुलै २०१९ ला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १४ पर्यंत मुक्काम असणार आहे.

घोराडवरून जातात हजारो वारकरीया महिन्यात घोराडवरून्न कुणी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन, व रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊन येतात. यात वयोवृद्ध, युवक व बाल गोपालकांचा समावेश आहे. हा महिना जणू घोराडकरांना पंढरीचे वेध लावणाराच ठरतो.

दोन पायदळ दिंड्या१५ वर्षांपासुन सुरू असलेली दिंडी आळंदीवरून प्रस्थान करते तर गत ४ वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी सुरू असून पवनार, देवळी, यवतमाळ, माळेगाव, औंढा, परभणी, गंगाखेडमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी