लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा असलेला महाकाळी येथील धाम प्रकल्प सध्या ६६.७७ टक्के भरला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अजूनही आॅक्सिजनवर असल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील मध्यम जलाशय आलेला पोथरा प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तर छोटे जलाशय असलेला कवाडी, अंबाझरी, लहादेवी, पांजरा बोथली, उमरी हे प्रकल्प सध्या १०० टक्के भरले आहे. लहादेवी प्रकल्पातून १ से.मी., पांजरा बोथली प्रकल्पातून १५ से.मी. विसर्ग सुरू आहे. तर मध्यम जलाशय असलेल्या पोथरा प्रकल्पाचे दरवाजे १६ से.मी.ने उघडण्यात आले आहेत. तसेच कार नदी प्रकल्प ३ से.मी. ओवर फ्लो आहे.सध्या बोर प्रकल्पात २९.५८ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ३३.७९ टक्के, धाम प्रकल्पात ६६.७७ टक्के, पंचधारा प्रकल्पात ६३.५४ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात ७८.९२ टक्के, मदन प्रकल्पात २०.६० टक्के, मदन उन्नई प्रकल्पात ३३.४८ टक्के, लाल नाला प्रकल्पात ८५.७२ टक्के तर सुकळी लघु प्रकल्पात ९०.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय लघु प्रकल्प असलेल्या सावंगी जलाशयात ५६.४६ टक्के, पारगोठाण जलाशयात ७२.८३ टक्के, टेंभरी जलाशयात १७.२७ टक्के, आंजी बोरखेडी जलाशयात १७.२७ टक्के, दहेगाव (गोंडी) जलाशयात २०.९२ टक्के, कुºहा जलाशयात १५.५६ टक्के, रोठा-१ जलाशयात २३.३७ टक्के, रोठा-२ जलाशयात ४९.९५ टक्के, आष्टी जलाशयात ४३.९५ टक्के, पिलापूर जलाशयात ५५.०० टक्के, कन्नमवारग्राम जलाशयात ८०.७८ टक्के, परसोडी जलाशयात २७.८७ टक्के, मलकापूर जलाशयात ५५.७७ टक्के, हराशी जलाशयात ६६.८५ टक्के, टाकळी बोरखेडी जलाशयात ३२.५२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
दोन मध्यम तर पाच छोटे जलाशय ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:28 PM
जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा असलेला महाकाळी येथील धाम प्रकल्प सध्या ६६.७७ टक्के भरला आहे.
ठळक मुद्देमहाकाळीचा धाम प्रकल्प भरला ६६.७७ टक्के : दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षाच