तळेगाव (शामजी पंत) :- नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खडका दरम्यान कंटेनर व अल्टो कार एकमेकावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले.
मृतांमध्ये दोघेही शासकीय कर्मचारी असल्याचे समजते ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले या अपघातातील मृतक अनंत व्यंकटराव मुसळे वय 52 वर्ष, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम, व सुभाष दत्तात्रय गायकवाड वय अंदाजे 55 जिल्हा आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन वाशिम या पदावर कार्यरत होते.
प्राप्त माहितीनुसार वाशिम येथील हे दोन्ही अधिकारी कोर्टाच्या केस संदर्भात कार क्रं. MH.37 G. 1601 ने नागपूर येथे जात होते तर कंटेनर क्रं. MH.14 FT 85 95 हा नागपूर कडून अमरावतीकडे जात होता नागपूर कडून अमरावती कडे जाणाऱ्या बाजुची वर्धा नदीवरील पुलावर एक्सपेंन्टेशन ज्वाईंटचे काम पंधरा दिवसांपासून सुरू असल्याने अमरावती कडे जाणार्या बाजुचा मार्ग बंद करुन भिष्णुरफाट्यापासून ते नवी भारवाडी दरम्यान दोन कि.मि. पर्यंतची वाहतुक एकाच बाजुने वळविण्यात आली आहे त्यामुळे एकाच बाजूने दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू असल्याने दोन्ही वाहने एकमेकाला धडकून हा भीषण अपघात घडला.
घटनास्थळावरून कंटेनरने पळ काढला असून अमरावती जिल्हाच्या हद्दित भारवाडी समोर कंटेनरला सोडून ड्रायव्हर पसार झाला या घटनेची माहिती तळेगांव पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अार्वी येथे पाठविण्यात आले आहे.अधिकचा तपास तळेगांव पोलिस करीत आहे.