शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी, भाजपचे आमदार समीर कुणावार धावले मदतीला

By महेश सायखेडे | Published: August 16, 2022 5:19 PM

आ. समीर कुणावार याच मार्गाने प्रवास करत होते. हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी आपले वाहन थांबवून तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. 

 महेश सायखेडे -वर्धा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही बाब हिंगणघाट येथील भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्या निदर्शनास येताच आमदारांनी आपले वाहन थांबवून जखमींना रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी सहकार्य केले. ही घटना कांढळी मार्गावर घडली.

भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने एम. एच. ३३ ए. सी. ५१६५ क्रमांकाच्या दुचाकीला धडक देत घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात सचिन बंडोजी मंगाम (२०) व अक्षय अशोक उईके (३५) दोघेही रा. सेलडोह हे गंभीर जखमी झाले आहे. या वेळी, आ. समीर कुणावार याच मार्गाने प्रवास करत होते. हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी आपले वाहन थांबवून तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. दरम्यान जाम येथील महामार्ग पोलीस चौकशीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका येताच जखमी सचिन मंगाम व अक्षय उईके यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे  रवाना करण्यात आले. या अपघाताची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Sameer Kunawarसमीर कुणावारBJPभाजपाAccidentअपघातPoliceपोलिस