शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

दोन अपघातात दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:22 PM

सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या आमगाव मार्गावर एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडल्या.

ठळक मुद्देएकाच ठिकाणी झाले दोन्ही अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली / बोरधरण : सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या आमगाव मार्गावर एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडल्या. दोन्ही अपघात एकाच ठिकाणी झाल्याने येथे नागरिकांची गर्दी झाली होती.पहिल्या अपघातात दुचाकी कारवर धडकली तर दुसऱ्या अपघातात दोन दुचाकी समोरामोर धडकल्या. पहिल्या अपघातात दुचाकी वाहन कारवर धडकले. यात एक जण गंभीर जखमी झाला. नितेश ऊईके रा. कोंढाळी असे गंभीर जखमीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तर एमएच ४०-एजे ६१५० क्रमांकाच्या दुचाकीने योगेश परतेकी, नितेश उईके व एक युवक असे तिघेही आमगाववरुन माळेगाव (ठेका) कडे जात होते. दरम्यान सामोरुन येणाऱ्या कारवर त्यांची दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील नितीन उईके हा युवक गंभीर जखमी झाला असून योगेश परतेकी याला किरकोळ मार लागला. तर तिसऱ्या युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हे तीनही युवक दारुच्या नशेत होते. या अपघातात कारचे बरेच नुकसान झाले. घटनास्थळाचा पंचनामा आंजी पोलीस चौकीचे ओमप्रकाश इंगोले यांनी केला असून यातील जखमीला सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे.त्याच जागी पुन्हा अपघातदुसºया अपघातात आमगाव येथून तीन युवक माळेगाव कडे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकने धडक दिली. यात वाहन चालक सौरभ चलाख याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंकज कवरतीच्या दोन्ही पायाचे गुढघे फुटले तर राहूल किरकोळ जखमी झाला. जखमींना सालई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले असता तेथे कोणतीच सोय नसल्याने त्यांना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपस्थित वैद्यकिय अधिकारी शेख यांनी प्राथमिक उपचार करून सौरभला पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात रवाना केले.

टॅग्स :Accidentअपघात