लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने प्रत्येक घर धुरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अनेक शिबिर आणि मेळावे झाले. असे असताना अद्यापही ग्रामीण भागात चुलीचा धूर निघत आहे. यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील गावांची निवड करून ती गावे धुरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यात देवळी तालुक्यातील हिवरा व कवठा (झोपडी) या दोन गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती एचपीसीएलचे नोडा अधिकारी आदित्य टांग यांनी पत्रकार परिषदेत दिली.देवळी तालुक्यातील या दोन गावांत एकूण ४५५ घर आहेत. यातील हिवरा येथे १९३ व कवठा येथे २६२ घर आहेत. या घरांचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सर्वेक्षणाअंती ज्या घरी गॅस सिलिंडर नाही अशा घरी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जे उज्ज्वला योजनेत बसत नाही त्यांना काही मोठ्या व्यक्तींकडून प्रायोजक तत्त्वावर गॅस जोडणी देण्यात येणार आहे. राबविण्यात येणार असलेल्या या योजनेचा शुभारंभ १४ एप्रिल पासून झाला आहे. त्यानुसार गरजवंतांचा शोध घेण्याकरिता सर्व्हे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत एकूण ४९ हजार ८२१ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत तर ३४ हजार ३९८ जणांना जोडणी मिळाली आहे. तर १५ हजार ४२३ नागरिक अद्यापही सिलिंडर जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेचा लाभ मिळण्याकरिता सुमारे ७० टक्के नागरिकांना कर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.विदर्भातील ११७ गावांची निवडराज्य धुरमुक्त करण्याकरिता शासनाच्यावतीने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेकरिता विदर्भातील एकूण ११७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांत शासनाच्यावतीने सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील दोन गावे होणार धूरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:00 AM
शासनाच्यावतीने प्रत्येक घर धुरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अनेक शिबिर आणि मेळावे झाले. असे असताना अद्यापही ग्रामीण भागात चुलीचा धूर निघत आहे.
ठळक मुद्देउज्ज्वला गॅस योजनेत मिळणार लाभ : आर्थिक स्थिती नसणाऱ्यांकरिता प्रायोजकत्त्व