लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद): खचलेल्या व बुजलेल्या विहीर योनजेतून जैतापूर येथील शेतकरी मधूकर धुर्वे यांना विहीर मंजूर झाली होती. पंचायत समितीमधून सदर विहिरीचे बांधकाम परस्पर ठेकेदाराला देत ते पूर्ण करण्यात आले. अडीच लाखांचा खर्चही पूर्ण दाखवला; मात्र या विहिरीचे बांधकाम सुमार दर्जाचे झाल्याने अवघ्या दोन महिन्यातच विहीर खचायला सुरू झाली आहे. सिमेंट काँक्रीटची विहीर खचणे ही बाब शेतकºयांच्या फारच जिव्हारी लागल्याने जिल्हाधिकाºयांकडे याप्रकरणी लेखी तक्रार करण्यात आली आहे.जैतापूर येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर धुर्वे यांच्याकडे मौजा इठलापूर शिवारात साडेतीन एकर शेती आहे. मजूर मिळत नसल्याने पती, पत्नी व दोन मुलींकडून शेतीची मशागत व लागवड ते करतात. शेतात सिंचनाची सोय व्हावी म्हणून त्यांनी अनुदानातून विहीर घेतली. याकरिता अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. करारनामा झाल्यावर संंबंधित ठेकेदाराने शेतकºयाचे पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले. कोºया धनादेशावर शेतकºयाची स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर बांधकाम केले. हे काम करताना अंदाजपत्रक बाजूला ठेवत मनात येईल तसे काम त्यांच्याकडून करण्यात आले.यावेळी मधुकर यांनी बांधकामाचा दर्जा योग्य नाही, असे मजुरांना सांगतच कंत्राटदारांना सांगा अन्यथा काम ठप्प करून टाकू, अशी धमकी त्यांना मिळाली. आहे. एप्रिल २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आले. मुख्य गाला (गाभारा) बांधल्यावर त्याच्या सभोतला गोटे, माती, मुरूम टाकून बुजविणे बंधनकारक होते; परंतु ठेकेदाराने काम सोडून दिले. जून महिन्यात पाऊस येताच विहिरीच्या सभोवताल ते साचले आणि मोठे भगदाड पडले. याची माहिती पंचायत समिती गटविकास अधिकाºयांना देण्यात आली. त्यांनी विहीर पहायला येतो, असे सांगितले. धुर्वे यांनी बरीच प्रतीक्षा केली; मात्र बिडीओ आलेच नाही.शेतकºयाचे बँकेचे सर्व व्यवहार ठेकेदार करून चुकला. पैसे ही काढले आता विहीर दुरूस्ती करण्याची वेळ आली. गाळ उपसावा लागणार आहे. त्यासाठी ठेकेदाराने जबाबदारी झटकली. आदिवासी शेतकºयाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कंत्राटदाराने स्वार्थ पूर्ण केला. आता जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी विहिरीचे बोगस व निकृष्ट बांधकाम झाल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. जैतापूर याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली असून काय कारवाई होते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
दोन महिन्यातच खचली विहीर, सुमार दर्जाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:29 PM
खचलेल्या व बुजलेल्या विहीर योनजेतून जैतापूर येथील शेतकरी मधूकर धुर्वे यांना विहीर मंजूर झाली होती.
ठळक मुद्देअनुदानात गौडबंगाल : पं.स. गटविकास अधिकाºयांचे दुर्लक्ष