लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शाळा आटोपून दुचाकीने घरी परत जात असतांना कारचालकाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान लसणपूरच्या पुलाजवळ घडली.राजु सर्जेराव भोयर (४६) रा. हिंंगणघाट असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. ते धोंडगाव येथील सरस्वती विद्यालयात कार्यरत आहे. शाळा सुटल्यानंतर एम.एच.३२ टी.५६५४ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. दरम्यान लसणपूरजवळ समोरुन येणाऱ्या एम. एच. ३४ एए.१६२९ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. या धडकेत शिक्षक भोयर यांच्या दोन्ही पायाला जबर मार लागला.त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचारानंतर सेवाग्राम रुग्णालयात हलविले. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. या रस्त्याचे बांधकाम सुरु असून कामाची गती अतिशय मंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खोदलेला असून गिट्टी पडून आहे. त्यामुळे वाहने चालवितांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
दुचाकी-कारची धडक; शिक्षक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:46 PM
शाळा आटोपून दुचाकीने घरी परत जात असतांना कारचालकाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान लसणपूरच्या पुलाजवळ घडली.
ठळक मुद्देलसणपूर शिवारातील घटना