शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

सौर उपसा सिंचनद्वारे पडिक जमीन आली सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:03 AM

तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचीनचे लाभले सहकार्य : दोन गावांची समृद्धीकडे वाटचाल

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सदर दोन्ही गावांच्या शेजारी असलेली पडिक जमीन सिंचनाखाली आली असून सदर प्रकल्प तेथील शेतकऱ्यांसाठी समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी फायद्याचा ठरत आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाचा व्याप अजून वाढविण्याच्या कामाला प्रशाकीय मान्यता मिळालीही आहे.येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी २७ एचपीची मोटार बसविण्यात आली आहे. ही मोटार सौर उर्जेवर चालत असून वीज निर्मितीसाठी १३२ सौर प्लेटस् बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येकी २३५ वॅट प्रमाणे अंदाजित ३० किलोवॅट विद्युत निर्मिती केली जाते. सुकळी लघुसिंचन तलावातून पाण्याचा उपसा करून मुख्य टाकीमध्ये घेतले जाते. त्यानंतर बंद नलिकेतून उप टाकी व्दारे पुन्हा लाभ क्षेत्रातील शेतामध्ये आणले जाते. प्रत्येक उपसा सिंचन योजनेमध्ये वितरण व्यवस्थेसाठी ११० मि.मी. आणि ९० मि.मी.च्या बंद नलिका वापरण्यात आल्या आहे. प्रत्येक योजनेतून आज मितीस अंदाजित २५ हेक्टर संरक्षित सिंचनाची व्यवस्था केली गेली आहे. बंद नलिकेतून सर्व लाभ धारकांना समसमान पद्धतीने पाण्याचे वितरण होत असल्याने पारंपारिक वितरण व्यवस्थेच्या तुलनेत पाण्याची नासाडी अत्यंत नगण्य आहे. तसेच शेतीकरिता लागणाऱ्या पाण्याचे शेतकºयाकडून व्यवस्थापन होत आहे.९० लाखांचे मिळाले सहकार्यसदर प्रकलाच्या निर्मितीसाठी युनान अक्षय ऊर्जा कंपनी लिमिटेड, चीनद्वारे ९० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर २० लााखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून देण्यात आला असून सध्या एकूण ८० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ जानेवारीला या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच आणखी शेतकऱ्यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने २१.२२ लाखांचा निधी देण्याच्या विषयाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून होणाºया कामांमुळे आखणी सुमारे चाळीस हेक्टरवरील शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात आले.या प्रकल्पामुळे बोथली (नटाळा) व पिंपळगाव (भोसले) भागातील मोठ्या प्रमाणात पडिक असलेली शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सौर उर्जेवर आधारित उपसा सिंचन योजना फलदायी ठरणारी आहे.- दीपक लांडगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, आर्वी.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प