लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: ‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु णींचा मूकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. या मोर्चाची सुरूवात स्थानिक शिवाजी चौक येथून झाली होती. सरकारच्या विरोधात असलेल्या विविध घोषणाबाजीचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने बेरोजगार तरु ण-तरु णी या मुकमोर्चात सहभागी झाले होते. सदर मोर्चाने शहरातील इंगोले चौक, बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्र मण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मुकमोर्चाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सरकारने तात्काळ पोलीस भरती प्रक्रि या, शिक्षक भरती प्रक्रि या आदी प्रक्रि या राबवावी अशी मागणी तरु ण-तरु णींनी केली. अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला सध्या काम नसून त्यांना सरकारच्या माध्यमातून कसे सन्मानजनक काम देता येईल यासाठीचे धोरण आखावे, अशा आशयाची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या मुकमोर्चात जिल्ह्यातील बेरोजगार तरु ण-तरु णी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.
वर्ध्यात सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ बेरोजगार तरु ण-तरु णी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:59 PM
‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु णींचा मूकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला.
ठळक मुद्देमूकमोर्चा काढून जिल्हा कचेरीवर दिली धडक