शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

बालविजेत्यांना ‘जंगल सफारी तथा रानवाचन’चा अनोखा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:24 AM

बहार नेचर फाऊंडेशनतर्फे पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना नाविण्यपूर्ण बक्षिसांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी घडवून वन्यजीव निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबहार नेचर फाऊंडेशनचा उपक्रम : विद्यार्थ्यांनी केले पक्षीनिरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहार नेचर फाऊंडेशनतर्फे पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना नाविण्यपूर्ण बक्षिसांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी घडवून वन्यजीव निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.बहारद्वारे पक्षी सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. 'मी पाहिलेला व मला आवडलेला पक्षी' विषयावर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी एकूण ३०० विद्यार्थ्यांमधून दीक्षा गंगाधर ढोणे केसरीमल कन्या शाळा, नादीया फिरोज खा पठाण गर्ल्स हायस्कूल आंजी, प्रणाली किशोर जोगे यशवंत हायस्कूल वायगाव, साहिल आकाश माटे जिजामाता विद्यालय, देवयानी गजानन बावणे बाबूराव बांगडे विद्यालय पवनार व पियूष साव सावित्रीबाई फुले विद्यालय वर्धा या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. बालचित्रकारांना जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देण्याकरिता बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच पक्षी निरीक्षण व बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख करून देण्यात आली. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सभा कक्षात आयोजित कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी तळवेकर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सचिव दिलीप वीरखडे यांनी बहार नेचर फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यवतमाळच्या प्रयास ग्रुपचे डॉ. विजय कावलकर, अश्विन सव्वालाखे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. यात विजेत्यांसह जयंत सबाने, आशिष पोहाणे, डॉ. जयंत वाघ, दीपक गुढेकर, दिलीप वीरखडे, डॉ. सायली इंगळे, दर्शन दुधाने, पार्थ वीरखडे, नम्रता सबाने, पवन दरणे आदी सहभागी झाले. बोर व्याघ्रचे सहा. वनसंरक्षक बोबडे, उपवन संरक्षक दिगंबर पगार, हिंगणीचे आरएफओ वाढे यांच्या सहकार्याने सफारी पार पडली.