लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या. यावर ‘लोकमत’ ने या संघटनांच्या डोळ्यात अंजन घालताच त्यांना जाग आली. या प्रकरणाविरूद्ध आवाज बुलंद करण्यासाठी एकवटलेल्या संघटनांची रविवारी दुपारी ४ वाजता स्वाध्याय मंदिरात बैठक आयोजित आहे. यावेळी आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, शुभांगीच्या घरी पोलिसांनी सीआयडीच्या नावावर जाऊन तिच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुण्यांची मागणी केल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय बळावत असल्याचा आरोप आदिवासी संघटना करीत आहे. या प्रकरणाच्या तपासाला पोलीस वेगळी दिशा का देत आहे, असा प्रश्न विविध संघटनांनी उपस्थित केला आहे. सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके या आदिवासी युवतीचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शिवाय ती ज्या मैत्रिणीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती, तेथून तिच्या मैत्रिणीसोबत परत आली; पण घरी पोहोचली नाही. त्याच सायंकाळी तिचा मृतदेह आढळला. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला. हा आरोप असताना दहेगाव पोलिसांनी तपास करण्याऐवजी सदर प्रकरण एक आत्महत्या म्हणून हाताळल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांच्यावतीने करण्यात आला. यामुळे विदर्भातून एकत्र येत आदिवासी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी या संघटनांची सभा आयोजित आहे. या सभेत काय निर्णय होतो, कोणत्या प्रकारचा लढा संघटना देतील, यावर चर्चा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर पंचारीया यांनी सांगितले. शुभांगीवर झालेल्या अन्यायाविरूद्ध एकत्र येत लढा उभारून तिला न्याय मिळवून दिल्याखेरीज शांत बसणार नसल्याची भूमिका संघटना घेणार असल्याचे कळते.‘लोकमत’च्या वृत्ताने घातले अंजनअन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात वर्धेतील समाजमन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. जिल्ह्यात एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचे म्हणत आदिवासी समाज रस्त्यावर उतरला; मात्र वर्धेकर चुप्पी साधून होते. असे होण्यामागचे कारण काय ? या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तातून सामाजिक संघटनांच्या डोळ्यात अंजन घातले. यातून संघटना जाग्या झाल्या व अन्यायाविरूद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. वृत्ताबाबत अनेक सामाजिक संघटनांनी ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले.एकजुटीच्या वज्रमुठीतून न्यायाची अपेक्षाशुभांगी मृत्यू प्रकरणात वर्धेकर संघटना एकत्र येत आहेत. या एकजुटीच्या वज्रमुठीतून शुभांगीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांकडून सीआयडीच्या नावावर शुभांगीच्या घरी भेट देत रक्ताचे नमुने घेण्याबाबत चर्चा आहे. यातून तपासाला मिळणारी दिशा भरकटल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक संघटनांची एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 11:18 PM
बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या.
ठळक मुद्देझालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनाबाबत होणार चर्चा