शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

वर्ध्यात लवकरच गांधी विचारांचे विद्यापीठ; सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:14 PM

तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देजनापाणी चौक ते शिवाजी चौकपर्यंतच्या रस्त्याचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जुनापाणी चौक पिपरी (मेघे) ते शिवाजी चौकपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण व मजबूतीकरण तसेच सौंदर्यीकरणाच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर, पिपरी (मेघे)चे  सरपंच अजय गौळकार भाजपा महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, माजी जि.प. सदस्य अविनाश देव, भाजपा किसान मोचार्चे संजय इंगळे तिगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या परिसराचाही विकास व्हावा या हेतूने आपल्याकडे आ. भोयर यांनी सदर रस्त्याच्या सिमेंटीकरणाची मागणी केली होती. या रस्त्याच्या सिमेंटीकरणासह मजबूतीकरण व सौंदर्यीकरणासाठी ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाले. परंतु, अद्यापही नागरिकांचे सर्वच प्रश्न सुटले असे म्हणता येणार नाही. काही प्रश्न सोडविताना काही अडचणीही येतात. जिल्ह्यात लवकरच २६६ कोटींचा सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे, ६ कोटींचे बस स्थानक आदी पूर्णत्त्वास जाईल. एकूणच वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम करीत आहो, असेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पी फॉर पिपरीशेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्राचा विकास करताना पूर्वी पी फॉर पुण्याचा पहिले तर पी फॉर पिपरी(मेघे) अशा ग्रामीण भागाचा नंतर विचार होत होता. परंतु, आता ज्या प्रमाणे पी फॉर पुणे विकसित होत आहे त्याच प्रमाणे पी फॉर पिपरीचाही विकास होईल, अशी ग्वाहीही याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांनी दिली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार