लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.कुलगुरु म्हणून कार्यकाळ संपल्याने प्रो. गिरीश्वर मिश्र यांना विश्वविद्यालयाकडून शनिवारी निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल होते. गालिब सभागृहात आयोजित समारंभात मंचावर कार्यकारी कुलसचिव प्रो. के. के. सिंह, वित्त अधिकारी कादर नवाज खान, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. कृपा शंकर चौबे उपस्थित होते. विद्यमान कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी प्रो. मिश्र यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन हिंदी व तुलनात्मक साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. रामानुज अस्थाना यांनी केले तर आभार वित्त अधिकारी कादर नवाज खान यांनी मानले.प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी आपल्या भाषणात विश्वविद्यालयातील अध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. आपल्या ५० वर्षांच्या अकादमिक प्रवासात आलेल्या अनुभवातून मी विश्वविद्यालयाचे सामाजिक, अकादमिक व भौतिक चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या उपलब्धिवर ते म्हणाले की वर्धा विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आता पूर्ण भारतभर रोजगार मिळवत आहेत. अनेक विश्वविद्यालयात व संस्थामध्ये येथील विद्यार्थी नोकरी करतात, हे आमच्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले की प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी प्रेरणादायी नेतृत्वातून विश्वविद्यालय अकादमिक व प्रशासनिक दृष्टिने संपन्न झाले आहे. उत्तराधिकारीच्या रूपात त्यांच्या पदचिन्हांवर चालून विद्यापीठाला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करणार. या समारंभात विश्वविद्यालयातील विविध विभागांकडून प्रो. मिश्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अमित राय, गैर शैक्षणिक कर्मचारी संघाकडून सहायक कुलसचिव राजेश अरोड़ा, कर्मचारी पत संस्थेकडून डॉ. अनिल कुमार दुबे, फॅकल्टी अॅण्ड आॅफिसर्स क्लब कडून डॉ. सुप्रिया पाठक, जनसंचार विभागाचे प्रो. कृपा शंकर चौबे, साहित्य विद्यापीठाचे प्रो. अवधेश कुमार, शिक्षण विद्यापीठाचे ऋषभ मिश्र यांनी स्वागत केले.
विश्वविद्यालय विश्वस्तरीय ज्ञानाचे केंद्र बनणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:15 PM
ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देगिरीश्वर मिश्र : कार्यकाळ संपल्याने कुलगुरुंना निरोप