लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने बुधवारी हे आंदोलन सुरू होते.वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत कल्पना रामटेके, शिला पाटील, बंडू ओंकार, प्रमोद नाखले व योगेश्वर नाखले हे गत पाच वर्षांपासून वन मजूर म्हणून काम करीत होते. परंतु, काही दिवसांपूर्वी या पाचही वन मजुरांना निधी नसल्याचे कारण पुढे करीत कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या पाचही वन मजुरांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची समस्या लक्षात घेता सदर पाचही वन मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. आंदोलनात असलम पठान यांच्यासह आयटकचे पदाधिकारी व कामावरून कमी केलेले पाचही वनमजूर आदी सहभागी झाले होते.दोघांची बिघडली होती प्रकृतीबेमुदत उपोषणावर बसलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी दोन वन मजुरांची प्रकृती आंदोलनाच्या दुसºया दिवशी सायंकाळी खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात कल्पना रामटेके व शिला पाटील यांचा समावेश होता. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
वन मजुरांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:05 AM
निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देजिल्हाकचेरीसमोर डेरा : ‘त्या’ पाच जणांना कामावर घेण्याची मागणी