पुरूषोत्तम नागपुरे।ऑनलाईन लोकमतआर्वी : वर्धा व अमरावती या दोन जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा क्षेत्रात आहे. मोर्शी व आर्वी विधानसभा तर वर्धा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करते. असे असताना २७ वर्षांपासून अप्पर वर्धा धरणस्थळी पर्यटनाला नाव देण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव धूळखात पडून आहे. यामुळे वर्धा, आर्वी आणि अमरावती व मोर्शी येथील पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहे. या उद्यानाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याकरिता तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्र्यांनी १९९२ पूर्वी आराखडा तयार केला होता.उद्यानासाठी प्रकल्पाच्या उजव्या बाजूला ४५.७९ हेक्टर जमीन व डाव्या बाजूला ३८.८८ हेक्टर जमीन प्रस्तावित होती. या दोनपैकी एका जागेवर मोठे उद्यान निर्माण होणार होते. १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव, खैरी येथील पेंच प्रकल्प व अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणस्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार सौंदर्यीकरणाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम झाले. यात बालोद्यान, धबधबे, वसतिगृह, उपहारगृहे, दुकाने, लॉगहट, मॉडेल्स, तंबु वसाहत, रस्ते पायवाट, प्राणी व पक्षी, मत्स्य संग्रहालय, रोपटे, पवनचक्की, जलक्रीडा अंतर्गत वॉटर पार्क, निसर्गोपचार केंद्र, योग केंद्र, त्या अनुषंगाने पोलीस चौकी प्रस्तावित होती. यासाठी १९९०-९१ मध्ये एकूण आठ प्रस्ताव प्राप्त झाले होेते. आॅगस्ट १९९२ नंतर तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी अप्पर वर्धा धरणाजवळील तिरावरील प्रस्तावित उद्यानाच्या जागेची पाहणीही केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील खासगी वास्तुशास्त्रज्ञ व डिझायनर उपस्थित होते. सर्वांची वरिष्ठ अधिकाºयासह अप्पर वर्धा धरणाच्या विश्रामगृहात चर्चा झाली होती. २७ वर्षांनंतरही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, सदर प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडलेला आहे.मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष देण्याची गरजहल्ली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रकल्प विदर्भात देत आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर हौशी पर्यटक आहेत. अमरावती व वर्धा पर्यटनस्थळाची खान असून अद्यापही व्यवसायाला चालना देण्यासाठी मध्यप्रदेशातील मोठ-मोठ्या व्यावसायिकांकडून प्रस्ताव आमंत्रित आहेत. मुख्यमंत्र्यांनी अप्पर वर्धा धरण उद्यानाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
उर्ध्व वर्धा प्रकल्प उद्यान योजना धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:56 PM
वर्धा व अमरावती या दोन जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा क्षेत्रात आहे. मोर्शी व आर्वी विधानसभा तर वर्धा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करते.
ठळक मुद्दे२७ वर्षांपासून प्रतीक्षा कायमच