लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोनाच्या धास्तीने सर्व काही सुरक्षित अंतर राखून कामकाज चालले असण्याच्या काळात वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा घाटगे येथील स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने एक वेगळीच शक्कल लढविली आहे. येथील मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या मार्गदर्शनात जगदीश माळोदे यांनी एक उपकरण बनवले. ग्राहकांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी चक्क प्लास्टिकच्या पाईपचा वापर करून एक नळकांडीवजा उपकरण बनवले. यात वरून धान्य टाकले की ते थेट ग्राहकाच्या खाली धरलेल्या पिशवीतच जाण्याची सोय करून दिली. यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात आवश्यक तेवढे अंतर आपोआपच राखले जात आहे व सुरक्षितता राखली जात आहे. त्यांच्या या प्रयत्नाची गावात चर्चा असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगसाठी प्लास्टिक पाईपचा वापरा; वर्धा जिल्ह्यातील अभिनव शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 2:39 PM