शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

Wardha news आर्वीच्या वैशाली हिवसे बनल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 12:47 PM

Wardha news आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

राजेश सोळंकी

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला  सशक्तीकरण म्हणून  आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली असल्याने आर्वीची (वर्धा )कन्या म्हणून विदर्भात गर्वाची आणि अभिमानाची ही  बाब आहे वैशाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर येथील नगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सेवाग्राम बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी नागपुरला  रामदेव बाबा कॉलेजमध्ये एम टेक पूर्ण करून  यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. हे बीआरओ आर्मीसोबत सलग्न आहे डिफेन्सच्या अंडरमध्ये आहे. चीन चायना बॉर्डर सध्याचे बांधकाम चालू आहे त्यांचा पूर्ण कार्यभार व त्यांची देखरेख वैशालीकडे आहे डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षापासून त्या कार्यरत आहेत्यांच्या आई या येथील मॉडेल हायस्कुल वाथोडा येथे मुख्याध्यापिका होत्या तर त्यांचे वडील येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक होते.  वैशाली यांचा  मोठा भाऊ डॉ सचिन हिवसे  आर्वीला बाल रोग तज्ञ  आहे त्याची लहान बहीण नागपूरला हायकोर्टात वकील आहे.

वैशाली हिवसे  सिविल कार्यकारी अभियंता आहे  त्यांनी कारगिल येथे दहा वर्ष  आव्हानात्मक परिस्थितीत कार्य केले आहे सोबतच दहा हजार फूट उंच पहाडीवर  वळण रस्ते  बोगदे  आणि  रस्तेचे संलग्निकरणांचे करण्याचे  कार्य करून ते बॉर्डर रोड ऑर्गनिझेशनने  पूर्णत्वास नेले आहे. मागील वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या वतीने बोगदा आंतरिक मार्ग ची निर्मिती केली.

 covid-19 च्या काळामध्ये महामारी सुरू असताना चायना बॉर्डर च्या रोडचे  काम ब्रो ने केले. ही बॉर्डर भारत चीन लागून लद्दाख सेंटरमध्ये आहे. सध्या लद्दाख जम्मू-काश्मीर उत्तरांखंड हिमालय प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात ब्रोचे  नियोजित मार्गाचे काम सुरू आहे.  तसेच 61 रस्त्याचे सुनियोजित कामाचे चायना बॉर्डरवरील हे कार्य डिसेंबर 2022 मध्ये ब्रो पूर्ण करणार आहे ,त्यासाठी सर्व सोयी सुविधा यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा कठीण कामात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्याचे कार्य बीआरओ करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . आधुनिक परिस्थितीत महिला सशक्तीकरणसाठी ब्रो ने पाऊले उचलली असून महिला अधिकारी  चांगल्या तऱ्हेने हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकतात,  म्हणून महिलांना जबाबदारी देण्यात आल्याचा असा विश्वास व्यक्त केला असून ब्रो ने  ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Governmentसरकार