शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ग्रा़पं़ निवडणुकीचे २००५ पासूनचे मानधन रखडले

By admin | Published: April 18, 2015 1:50 AM

ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणूक कामाकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे २००५ पासूनचे थकित मानधन अद्याप देण्यात आलेले नाही.

समुद्रपूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणूक कामाकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे २००५ पासूनचे थकित मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते त्वरित शिक्षक कर्मचारी यांना देण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक पोटनिवडणूक मतदानाच्या कामाकरिता जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना प्राधान्याने नियुक्त केले जाते़ काही वेळेस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर जावे लागते़ कर्तव्य जबाबदारीने पार पाडलेली असताना जून २००५ पासून पार पडलेले विविध टप्प्यातील निवडणूक कामाचे मानधन आजपर्यंत प्रशासनाने जबाबदारी समजून दिले नाही़निवडणुकीच्या कामासाठी मूळ मुख्यालयाऐवजी इतरत्र नियुक्त कर्तव्यस्थळी दोन दिवसांच्या दक्षतापूर्वक निवासाने राहावे लागते़ सदर कालावधीतील रहिवास व आवश्यक दोन दिवसांची दैनंदिन गरज लक्षात घेता मानधन मिळणे अत्यंतिक गरजेचे आहे़ त्यामुळे जून २००५ ते एप्रिल २०१५ पर्यंत पार पडलेल्या निवडणूक कामाचे मानधन तसेच लोकसभा २०१४ व विधानसभा २०१४ करिता बी़एल़ओ़ म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांचे कामाचे मानधन देण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष कोडापे, सरचिटणीस दिलीप झाडे, कार्याध्यक्ष बंडू सोनवणे, उपाध्यक्ष नाना आडकीने, कोषाध्यक्ष शिवाजी फुंदे यांच्यासह वामन शेळकी, हेमंत बढीये, गजानन ठोंबरे, जयंत बोचरे, सुशील गायकवाड, सुनील लोंडे, विशाल केदार, विलास भराडे, योगीरात बोरकुटे, योगीराज कोहचाडे, भास्कर कलाम, महाजन, शेडमाके उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)