सहा लाखांचा दारूसाठा जप्त : सेवाग्राम पोलिसांकडून १२ जण अटकेतवर्धा: शहरातील आनंदनगर व पुलफैल भागात शहर पोलिसांकडून दारूबंदी मोहीम राबविण्यात आली. यात एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही करवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत दारूविक्रेत्यांनी लावलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत जमिनीत गाडून गावठी दारू गाळण्याकरिता तयार ठेवलेले साहित्य जप्त केले. या साहित्यावरून दारू गाळणाऱ्यावर गुन्हा दाखल करून साहित्याचा नाश करण्यात आला. या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एम. बुराडे, विजय मगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. अल्लीपूर पोलिसांनी धानोरा शिवारात पारधी बेड्यावर धाड टाकून मोहा भट्टी उद्ध्वस्त करून सुनील भोसले याला अटक करण्यात आली. मंगळवारी अशीच मोहीम सेवाग्राम पोलिसांनी पांढरकवडा पारधी बेड्यावर राबविली. यात १२ ठिकाणी केलेल्या कारवाईत १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)
वर्धेत गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: June 04, 2015 1:53 AM