शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वर्धेकरांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा; सावित्रीच्या लेकींचा सन्मान करीत वटवृक्षारोपण

By अभिनय खोपडे | Updated: June 3, 2023 18:17 IST

यावेळी पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही देण्यात आला.

वर्धा : पतीच्या दीर्घायुरारोग्याची कामना करीत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना वटवृक्षाला फेऱ्या मारीत आणि सूत्र गुंडाळीत वटसावित्रीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेतील विषमतेला फाटा देत स्त्रीपुरुष समानतेचा व वृक्षारोपणाचा संदेश देणारी आगळीवेगळी वटपौर्णिमा वर्धेकरांनी साजरी केली. 

स्थानिक निसर्ग सेवा समिती परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी विविध जोडपी वटपौर्णिमेच्या सकाळी एकत्र आली. स्त्रियांनीच आपल्या नवऱ्यासाठी व्रतवैकल्ये करावीत, त्यांच्या पाया पडावे, दीर्घायु लाभण्यासाठी उपवास करावा, या असमानता रुजविणाऱ्या परंपरेला नाकारत या जोडप्यातील पुरुषांनी पत्नीचे पूजन केले, वृक्षरोप देऊन तिचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या चक्क पाया पडत तिच्या दीर्घायुष्याची कामनाही याप्रसंगी पतिराजांनी केली. यावेळी पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही देण्यात आला. या सर्व जोडप्यांनी मिळून परिसरात वड व अन्य वृक्षांची रोपटी लावली आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रदक्षिणाही घातली. 

या आगळ्यावेगळ्या उपक्रमात डॉ. शोभा व मुरलीधर बेलखोडे, सुरेखा व भाऊ थुटे, प्रा. वनिता व प्रशांत देशमुख, संगीता व संजय इंगळे तिगावकर, शोभा व दामोदर राऊत, संजीवनी व दत्तात्रय कानसकर, वनिता व बाबाराव भोयर, डॉ. मेघा व सुहास लांडगे, वर्षा व प्रफुल्ल लिंगावार, विद्या व प्रमोद भोयर, वैष्णवी व स्वप्नील देशमुख, जयश्री व दिलीप वाकडे, मनीषा व विजय भगत, शीतल व निलेश बाभळे, शीतल व अनुप खडसे, विजयश्री राजेंद्र साळुंखे, यशवंत नलोडे, कृष्णा आखरे, डॉ. अनिल लोणारे, राजकुमार वासेकर, राजेंद्र घोडमारे, अरविंद मेश्राम, बाबाराव सावरकर, अनिल देवतळे, प्रफुल्ल द्रव्यकर, श्रीराम नौकरकर, जनार्दन खोत, गौतम फुलमाळी, नितीन डगवार, विजय भगत, देवीप्रसाद उपाध्याय, रमेश बेद, बाळकृष्ण पडवे, अजय तिगावकर, वसंत बाभूळकर, अमित शिंदे, राधिका भोयर, संजीव शेळके आदी सहभागी झाले होते. यावेळी, वृक्षारोपण करून इहा देशमुख या विद्यार्थिनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणwardha-acवर्धा