१४ मतदान केंद्रावर झाले मतदान वर्धा: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यात ४ हजार २७९ मतदार आहेत. यापैकी २ हजार ९४८ पुरूष व १ हजार ३३१ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. आज झालेल्या मतदानामध्ये सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २ हजार ६५३ मतदारांनी मतदान केले. वर्धा येथील एक मतदान केंद्र वगळता सरासरी अंदाजे ६२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या ३५ हजार ९ इतकी आहे. यापैकी २३ हजार ८३८ पुरूष व ११ हजार १७१ महिला मतदार आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा अशा एकूण ६ जिल्ह्यात १२४ मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेकरिता ६८० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या सोमवारी रोजी नागपूर येथील सेंट उर्सुला शाळेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.(प्रतिनिधी)
शिक्षक मतदार संघाकरिता वर्धेत ६२ टक्के मतदान
By admin | Published: February 04, 2017 12:20 AM