शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

वरुणराजाची दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलाशयातील पाणी पातळीत वाढ : नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यातील आठही तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या आणि मोठ्या तसेच मध्यम जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय काही जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. एकूणच मागील २४ तासांत झालेला पाऊस उभ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे. शिवाय शेतकरीही सुखावला आहे.महाकाळीचा धाम झाला फुल्लखरांगणा (मो.) : नजीकच्या महाकाळी येथील धाम प्रकल्प सततच्या पावसामुळे १०० टक्के भरला आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत असून खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाम नदी पात्रातील पाणी साठा वाढल्याने काचनूर, कासारखेडा, खरांगणा, मोरांगणा या गावात दवंडी देऊन नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.सेवाग्रामात जनजीवन विस्कळीतसेवाग्राम : शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सततचा पाऊस सुरू राहिल्याने चाकरमानी वगळता अन्य नागरिकांना घरातच थांबावे लागले होते. शिवाय बाजारपेठ बंद राहिल्याने रस्तेही निर्मनुष्य होते.कारंजाचा खैरी प्रकल्प भरला १०० टक्केकारंजा (घा.) : तालुक्यातील खैरी प्रकल्प सततच्या पावसामुळे सध्या १०० टक्के भरला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या शेजारील गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी सुखाबला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.१०० वर्षे जुने झाड कोसळलेहिंगणघाट : शुक्रवारी संततधार पावसादरम्यान स्थानिक गांधी वॉर्ड येथील अ‍ॅक्सिस बँक चौकातील १०० वर्षे जुने कडूनिंबाचे डेरेदार वृक्ष कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, प्रा. संदीप रेवतकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, काम कासवगतीने सुरू असतानाच ही घटना घडली. या भागातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.निम्न वर्धा धरणाचे १५ दरवाजे उघडलेदेऊरवाडा/ आर्वी : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा जलाशय ७४ .८१ टक्के भरला असून या धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ६०२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. निम्न वर्धा जलयाशातील पाणी वर्धा नदीत सोडले जात असल्याने या नदी काठावरील धनोडी बहादरपूर, वडगाव पांडे, दिघी (हो.), सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस