लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणेशभक्त ज्यांची वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहताहेत, ते बाप्पा शनिवारी विराजमान होत आहेत. या चैतन्यदायी वातावरणावर यंदा मात्र कोरोना आणि पावसाचे सावट दिसून येत आहे. गणेशमूर्र्तींचे प्रदर्शन आणि विक्रीस्थळी प्रांगणात पावसाचे पाणी साचल्याने मूर्तिकारांची मात्र तारांबळ उडत आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि घरोघरी श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसून येत नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास आदीकामे पूर्णत्वास गेली आहेत. दुसरीकडे गणेशचतुर्र्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गेल्या चार दिवसांपासून गजबजलेल्या दिसून येत आहेत. पण, विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षी होणारे स्वागत यंदा थंडच होणार आहे. कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची फारशी लगबग दिसून येत नाही. अनेकांनी उत्साह साजरा करण्याचेच टाळले आहे. घरगुती उत्सवावरही बंधने आहेत.कोरोनामुळे यावेळी प्रशासनाने मगनसंग्रहालय परिसरात मूर्तिकारांना दुकाने लावण्यास मनाई केली. त्यामुळे सर्कस मैदान आणि केसरीमल कन्या विद्यालयाच्या प्रांगणावर कुंभार समाजबांधवांनी गणेशमूर्तीची दालने उभारली आहेत. केसरीमल कन्या विद्यालयाच्या प्रांगणावर गणेशमूर्तीची २० तर सर्कस मैदानावर २० ते ३० दालने लागली आहेत. मात्र, प्रशासनाने मूर्तिकारांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याचे येथील परिस्थितीवरून लक्षात येते. शुक्रवारी सकाळपासूनच दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे दोन्ही प्रांगणांना पाणी साचल्याने तळयाचे स्वरूप प्राप्त झाले. सर्कस मैदानावर तर सर्वत्र चिखल तयार झाला आहे. अनेक दालनांमध्ये पाणी शिरले आहे. गणेशमूर्र्तींवर प्लास्टिक अंथरण्यात आले आहे.मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती येथे विक्रीला आहेत. परंतु, पावसामुळे मूर्तिकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी गणेशभक्तांनाही पाणी आणि चिखलातूनच मूर्ती घरी न्यावी लागणार, असे चित्र आहे. कोरोनाचे सावट असतानाच पावसामुळे उत्सवाच्या उत्साहावर काही अंशी पाणी फेरले गेले असल्याचे चित्र आहे.
बाप्पांच्या आगमनाला वरुणराजाची सलामी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:00 AM
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि घरोघरी श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसून येत नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास आदीकामे पूर्णत्वास गेली आहेत. दुसरीकडे गणेशचतुर्र्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गेल्या चार दिवसांपासून गजबजलेल्या दिसून येत आहेत.
ठळक मुद्देमूर्तिकारांची दाणादाण : गणेशमूर्तींचे प्रदर्शन, विक्रीस्थळ असलेल्या दोन्ही प्रांगणांना तळयाचे स्वरूप