लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : येथील बाबा फरीद दर्गाह टेकडीवर दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांचे वाहन अनियंत्रित होत उलटले. या अपघातात १३ जण जखमी झाले असून १२ जण थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील चिंचोळकर कुटुंबीय बाबा फरीद दर्गाहवर स्वयपांक घेऊन दर्शनासाठी जात होते. त्यांचे एम.एच.२९ ए.टी. ०८१२ क्रमांकाचे वाहन टेकडी चढत असताना वळण रस्त्यावर वाहन अनियंत्रित झाले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन पलटी झाले. यात राजू चिंचोळकर (४८), रंजनी चिंचोळकर (४०), प्राजक्ता चिंचोळकर (२३), छाया चिंचोळकर (४२), भाग्यश्री क्षीरसागर (२५), नेहरू क्षीरसागर (५५), रेखा जगनाळे (५०), सुभाष कुरसाडे (३०), शांता चिंचोले (६५), धनश्री चिंचोळकर (११), लता क्षीरसागर (५०), सजंय चिंचोळकर (४०), कार्तिक चिंचोळकर (६०) सर्व रा. वरोरा हे जखमी झाले. अपघाताची माहीती मिळताच सोनू ठाकूर, राहुल गाढवे, महेंद्र गिरडे, टिंकू खाटिक, मयन पाठक यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले.शिवाय घटनेची माहिती पोलिसांना दिली. राजू विठ्ठल चिंचोळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्रसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, अजय वानखेडे, महेंद्र गिरी, शेख रहीम यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय, खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटेनची नोंद पोलिसांनी घेतली आहे.चिस्तूर शिवारात कार उलटून तिघे जखमीतळेगांव (श्या.पं.) : येथील राष्ट्रीय महामार्गावर चिस्तूरनजीक भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विलास भाष्कर रोठे व त्यांच्या भगिनी एम.एच.३० एल.७७९५ क्रमांकाच्या कारने नागपूर येथून अकोल्याकडे जात होते. भरधाव कार चिस्तूर शिवारात आली असता ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न झाला. याच वेळी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार थेट मुंदडा यांच्या मालकीच्या शेताजवळ जाऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कारने चार पलट्या घेतल्या. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाले तर विलास रोठे आणि त्यांच्या भगिनी गंभीर जखमी झाल्या. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी अमरावतीच्या दिशेने रवाना केले. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर दोन जखमींची नावे कळू शकली नाही.
वाहन उलटले; १३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:44 PM
येथील बाबा फरीद दर्गाह टेकडीवर दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांचे वाहन अनियंत्रित होत उलटले. या अपघातात १३ जण जखमी झाले असून १२ जण थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देदर्गाह टेकडी भागातील घटना : वळणावर वाहनावरील ताबा सुटला