शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खरांगणा ते कोंढाळी मार्गावर चिखलात रूतून बसतात वाहने

By admin | Published: July 16, 2016 2:26 AM

एकेरी वाहतुकीचा मार्ग असलेल्या खरांगणा ते कोंढाळी या मार्गावर धावणारी अनेक जड वाहने मातीत रूतली आहे.

प्रकार झाला नित्याचाच : सर्वत्र खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी, अपघाताच्या घटनांत वाढ आकोली : एकेरी वाहतुकीचा मार्ग असलेल्या खरांगणा ते कोंढाळी या मार्गावर धावणारी अनेक जड वाहने मातीत रूतली आहे. काही वाहने नादुरूस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी आहे. या प्रकारामुळे इतर वाहनांना समोरची वाट शोधताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खरांगणा येथून कोंढाळीपर्यंत जाण्याकरिता असलेला मार्ग हा एकेरी वाहतुकीचा आहे. हैदराबाद ते भोपाळ जाणारी वाहने या मार्गावरून धावतात. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांची या मार्गावर नेहमी गर्दी असते. तसे पाहता हा मार्ग घाटाचा आहे. मार्गाची अवस्थाही दयनीय आहे. तरीदेखील नागपुरातून निघणारी अनेक वाहने याच मार्गाने हैदराबादकडे जाण्याकरिता वर्धा जिल्ह्यात प्रवेशित होतात. हैदराबादकडून भोपाळला जाण्याकरिता आडमार्गाने आलेली वाहने याच मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर निघण्याचा प्रयत्न करतात. सदर मार्गामुळे अंतर कमी होत असले तरी मनस्ताप वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गाच्या दुतर्फा चिखल तयार झाला आहे. त्यामुळे दोन वाहने एका मार्गावरून समोरासमोर आल्यास एका वाहनाला रस्त्याखाली उतरावे लागते. जे वाहन खाली उतरेल ते वाहन मातीत रूतल्याशिवाय राहत नाही. कित्येकदा एकमेकांच्या समोर आलेली वाहने समोर जाण्याच्या नादात मातीत रूतल्याचे पाहावयास मिळते. त्यातील काही ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे या मार्गावर वारंवार दिसतात. अर्धे वाहने रस्त्यावर तर अर्धे वाहन रस्त्याखाली असाच प्रकार या सर्व ट्रकांचा आहे. येथून समोर जाताना लहान वाहनांना जपून वाहन काढण्याची वेळ येते. सदर मार्गावर प्रवासी वाहनांची संख्या कमी असताना जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. पावसानंतर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातच जड वाहने या मार्गावर धावत असल्याने रस्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. जड वाहतूक लक्षात घेता या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले असून तशी मागणी या मार्गावरील प्रवासी वारंवार करीत आहेत. (वार्ताहर)