विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शासनाने विविध माध्यमातून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या. यामुळे कधी शिधापत्रिकाधारकांना, तर कधी स्वस्त धान्य दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे वास्तव आहे.शिधापत्रिकेवर ज्यांचे नाव आहे, असे कुटुंबातील सर्वच सदस्यांचे अंगठे ई-पास मशिनवर घेऊन खरेच त्यांचे आहे किंवा नाही, हे पडताळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदाराला घरोघरी जाऊन करावयाचे आहे. मात्र, कुटुंबातील सर्वच सदस्य एकाच वेळी घरी मिळेल, हे ग्रामीण भागात शक्य नाही. त्यातही लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तीचे अंगठ्याचे ठसे वयोमानानुसार जुळत नसल्याची ओरड आहे. ई-पास मशिनची चार्जिंग आणि रेंज याचादेखील स्वस्त धान्य दुकानमालकांना सामना करावा लागणार आहे. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल, त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येत नसेल तर अशावेळेस सत्यापन कसे होणार, हा यश प्रश्न उभा ठाकत आहे.या सत्यापनासाठी बाहेरगावी शिक्षणासाठी असणाऱ्यांना आता अंगठा सत्यापनासाठी यावे लागणार आहे. योजना चांगली आणि हितकारक असली तरी ही डोकेदुखी ठरणार असल्याचे मत दुकानदार आणि लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.प्रत्येकाचे अंगठे घेऊन, आधार कार्डाची फिलिंंग करणे याकरिता मोठा अवधी लागणार आहे. सद्यस्थितीत ई-पासद्वारे धान्य घेण्यासाठीच शिधापत्रिकाधारकांना त्रासाचा सामना करावा लागत असताना आता सत्यापन कार्यक्रमानंतर शिधापत्रिकाधारकांची डोकेदुखी कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.लहान मुलांचे, वयोवृद्धांचे अंगठे जुळत नसतील, तर अशांनी नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले अंगठे अपडेट करावे. तेव्हा सत्यापन करण्यास मदत होईल.- प्रज्वल पात्रे, पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय, सेलू.
स्वस्त धान्य वितरणमध्ये आता सत्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:17 PM
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शासनाने विविध माध्यमातून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या. यामुळे कधी शिधापत्रिकाधारकांना, तर कधी स्वस्त धान्य दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे वास्तव आहे.
ठळक मुद्देघरोघरी अंगठे घेऊन तपासणी : दुकानदारांची वाढली डोकेदुखी