आॅनलाईन लोकमतवर्धा: आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आष्टी बस स्थानकात आंदोलन केले व वरिष्ठांसोबत बोलणी झाल्यानंतर ही बस रवाना झाली.वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बससेवेवरच अवलंबून असतात. मात्र ही बससेवा त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बसेसच्या नियमित फेऱ्या कमी झाल्या आहेत, तर काही बसेसच बंद आहेत. याचा कडेलोट मंगळवारी संध्याकाळी झाला.शाळा सुटल्यावर आबादकिन्ही, मोई व मुबारकपूर येथील ४८ विद्यार्थी आष्टीच्या बसस्थानकावर चार तास ताटकळत उभे होते. तेथे लाईट नाही, महिलांकरिता शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोयही नाही, सगळीकडे घाणीचेच साम्राज्य आहे. अशा ठिकाणी हे विद्यार्थी शाळेतून सुटून चार साडेचार तास बसून होते. या परिसरात डासांचाही मोठा प्रादुर्भाव आहे.संध्याकाळचे सात वाजले तरी बस आली नाही हे पाहून विद्याथ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखेडे यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले व त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास बस आली व हे विद्यार्थी आपापल्या गावाकडे रवाना झाले.
वर्धा जिल्ह्यात बससाठी ४८ शालेय विद्यार्थी रात्री ९.३० पर्यंत रस्त्यावर ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:00 PM
आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली.
ठळक मुद्देबस चार तास उशीराविद्यार्थ्यांनी बसस्थानकावर केले आंदोलन