भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शाळेतील चार भिंतीआड मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा गावात मिळणारे संस्कार व शिकवण ही फार महत्त्वाची असते. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘गाव ही विश्वाची शाळा’ असे म्हटले आहे. त्यांचे हेच विधान आता शाळा व ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आजनसरा या संत भोजाजी महाराजांच्या जन्मभूमीत सत्यात उतरताना दिसत आहे. येथे ‘आमचं गाव’ या उपक्रमांतर्गत गावातील घरांच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे ओसाड भिंती बोलक्या होऊन गावातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यास मदतगार ठरत आहे.तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शानासाठी येतात. त्यामुळे या गावाची एक वेगळी ओळख आहे. गावातील मुलांच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळावी याकरिता प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी ‘आमचे गांव’ हा उपक्रम होती घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, शिक्षणाची गोडी लागावी आणि सहज सोप्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणातून शिक्षण घेता यावे, यासाठी गावातील घरांच्या भिंती रंगविण्यात आल्या. शाळेच्या परिसरासह गावातील भिंतीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोणातून उपयुक्त असे चित्र, अभ्यासकांचे छायाचित्र, सुत्रे व आकृती रेखाटण्यात आल्या. यामुळे गावाच्या सौदर्यातही भर पडली असून विद्यार्थ्यांना जाता-येता, बसता-उठता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासही मदत होत आहे. त्यामुळे गावच आता शाळा झाले असून गावतील भिंती या फळ्याची कामगिरी बजावत आहे. या नव्या उपक्रमामुळे गावातील चिमुकल्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता भिंतीच वाचायला लागलेगावातील शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी गावातील ओसाड पडलेल्या भिंती चित्राच्या माध्यमातून बोलक्या केल्या आहे. या भिंतीवर चौदाखडी, गणितीय सूत्रे, समीकरणे व अपूर्णांकाच्या आकृती, शाब्दिक उदाहरणे, विषय सोपा परिच्छेद वरून माईंड मॅप, मुळ संख्या, संयुक्त संख्या, रोमन संख्या, मराठी महिने, इंग्रजी महीने, संख्यांचा चार्ट, लिहिण्यासाठी ब्लॅक बोर्ड इत्यादी विषयांसंदर्भात चित्र रेखाटले आहे. आता गावातील मुले हसत-खेळता या भिंती वाचतात. यामुळे गावात शैक्षणिक वातावरणात निर्माण झाले. या शैक्षणिक उपक्रमाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी सरपंच श्रावन काचोळे, उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक तसेच प्रथमचे मोरेश्वर खोंड व गावकºयांचे सहकार्य मिळाले आहे.
गाव झाली शाळा अन् भिंती झाल्या फळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM
तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शानासाठी येतात. त्यामुळे या गावाची एक वेगळी ओळख आहे. गावातील मुलांच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळावी याकरिता प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी ‘आमचे गांव’ हा उपक्रम होती घेतला.
ठळक मुद्देशैक्षणिक उपक्रम : घरांच्या ओसाड भिंती झाल्या बोलक्या, रंगरगोटीने गावाच्या सौंदर्यातही पडली भर