लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याने वर्धा जिल्हा हा शासनाच्या लेखी ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. पण, या जिल्ह्यालगतचे नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर असे चार जिल्हे आहेत. यापैकी वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अद्याप शिरकाव झाला नाही. मात्र, वर्धा जिल्ह्यालगत असलेले नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. विशेष म्हणजे, सीमाबंदीनंतरही या तिन्ही जिल्ह्यांतून ये-जा करणाºयांची संख्या बरीच होती. या तिन्ही जिल्ह्यातून वर्ध्यात येणाºयांसाठी बरेच रस्ते असल्याने वाहनचालक चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शिरत होते. अनेक शासकीय व खासगी कर्मचारीही कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात रोजच अपडाऊन करायचे. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. मात्र, आडमार्गाचा पर्याय शोधून काढल्याने प्रशासनही हतबल झाले. यामुळे कोरोनामध्ये निगेटिव्ह असलेला वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता बळावली होती. ‘आपली सुरक्षा आपल्याच हाती’ असल्याने तिन्ही जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावांनी पुढाकार घेत सर्व लहान-मोठे रस्ते बंद करून चौकी तयार केली आहे. गावातील नागरिक कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºयावर वॉच ठेवून असल्याने सर्वांसाठीच आता कडकोट सीमाबंदी झाली आहे.तीन जिल्ह्यांच्या रोखल्या सीमाकोरोनाच्या ‘हॉटस्पॉट’मध्ये असलेल्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. वर्धा नदीमुळे अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा निर्धारित झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातून येणाºयांनी मुख्य मार्ग सोडून आष्टा (वडाळा) मार्गे आपला मोर्चा वळविला होता. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी पोहणा, वारा, पोटी, शिरपूर, आंजी-अंदोरी यासह इतरही आडमार्गाने प्रवास सुरू केला होता. नागपुरातून येणाºयांची हिंगणा, कान्होलीबारा, गायमुख, जुनगड या रस्त्यांनी वर्दळ होती. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून येणारा प्रत्येक मार्ग गावकºयांनी आता बंद केला आहे.
अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 8:03 PM
वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.
ठळक मुद्दे‘रेड झोन’मधून येणाऱ्यांवर ‘ग्रीन झोन’मध्ये वॉचशंभरावर गावांनी रोखल्या जिल्ह्याच्या सीमा